JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ऐश्वर्या रायचा Ponniyin Selvan रिलीजपूर्वीच अडचणीत; थिएटर्स मालकांना मिळाली धमकी

ऐश्वर्या रायचा Ponniyin Selvan रिलीजपूर्वीच अडचणीत; थिएटर्स मालकांना मिळाली धमकी

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बऱ्याच दिवसानंतर मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार आहे. मणिरत्नम यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन 1’ सध्या चर्चेत आहे.

जाहिरात

ऐश्वर्या राय-बच्चन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बऱ्याच दिवसानंतर मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार आहे. मणिरत्नम यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन 1’ या शुक्रवारी अर्थातच 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. मणिरत्नम यांच्या प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे देशभरातील चित्रपटप्रेमी मणिरत्नम यांचा हा आगामी पॅन इंडिया चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील हॅमिल्टन, किचनर आणि लंडनसारख्या शहरांमधील थिएटर मालकांना ‘पोन्नियिन सेल्वन’ रिलीज होण्यापूर्वी अडचणीचा सामना करावा लागत आहे.पाहूया नेमकं काय घडलंय . मीडिया रिपोर्ट्सनुसार, KW टॉकीजच्या विदेशी वितरकांनी ट्विटरवर ‘‘पोन्नियिन सेल्वन’बाबत सांगितलं आहे की, त्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात धमकीचे ईमेल्स येत आहेत. धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये मणिरत्नम यांचा चित्रपट देशात प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृहांमध्ये गोंधळ करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे ऐश्वर्या रायचा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अडचणीत सापडल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणात KW टॉकीजच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत लिहलंय, ‘माझ्याकडे हॅमिल्टन, किचनर आणि लंडनचे अपडेट आहेत. PS1 तमिळ चित्रपट किंवा KW टॉकीजचा चित्रपट चालवल्यास ते हल्ला करतील, अशी धमकी सर्व थिएटर मालकांना देण्यात आली आहे’. परंतु हे पहिल्यांदाच घडलंय असं नाहीय. तामिळ चित्रपटाला कॅनडातील काही गटांकडून धमक्या येण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

दुल्कर सलमान स्टारर मल्याळम चित्रपट ‘कुरूप’ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ओंटारियोमध्ये प्रदर्शित झाला होता. रिचमंड हिल आणि ओकविले येथील दोन सिनेप्लेक्समध्ये स्क्रीनचे पडदे कापण्यात आले होते. ज्यावर कुरुप चित्रपट दाखवण्यात आला होता. या सर्व प्रकारानंतर चार स्क्रीन खराब झाल्या होत्या. **(हे वाचा:** Deepika Padukone Health: दीपिकाला नक्की झालंय तरी काय? अनेक टेस्टनंतर समोर आली हेल्थ अपडेट ) हा चित्रपट तमिळ भाषेतील एपिक चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या त्याच नावाच्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे. या बिग बजेट चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा कृष्णन, कार्ती, जयम रवी, पार्थिवन, शोभिता धुलिपाला अशी तगडी स्टारकास्ट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ऐश्वर्या राय दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत.ऐश्वर्या रायला बऱ्याच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या