न्यूड फोटोशूटमुळे निर्माण झालेलं वादग्रस्त वातावरण थंड होत नाही तोच रणवीर सिंहनं आणखी एक फोटोशूट केलं आहे. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणी वाढलेल्या पहायला मिळत आहे. रणवीरनं केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे तो चांगलाच अडचणींत सापडला आहे.
न्यूड फोटोशूटमुळे रणवीरनं सगळ्यांनाचा थक्क करुन सोडलंय. या फोटोंमुळे रणवीरला अनेक ट्रोलिंग आणि आरोपांचा सामना करावा लागला आहे. एवढंच काय तर न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहवर एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे.
रणवीर सिंहला अटक करण्याचीही मागणी केली जात आहे. त्यामुळे त्याच्या अडणींमध्ये आणखी वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
न्यूड फोटोशूटमुळे निर्माण झालेलं वादग्रस्त वातावरण थंड होत नाही तोच रणवीरनं आणखी एक फोटोशूट केलं आहे.
रणवीरचं हे नवं फोटोशूट काही क्षणातच व्हायरल झालेलं पहायला मिळतंय. या नव्या फोटोशूटमध्ये रणवीरनं पूर्ण कपडे घातलेले दिसत आहे.
न्यूड फोटोशूटनंतर थेट पूर्ण कपड्यातलं फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी रणवीर आणखीनच ट्रोल करायला सुरुवात केलीये.
'कोणी तरी कपडे दिले वाटतं, कपड्यात चांगला वाटतोय, यावेळेस पण न्यूडच फोटोशूट करायचं ना?, भाईचा मूड खराब आहे वाटतंय काही अतरंगी नाही घातलं', अशा अनेक प्रकारच्या भन्नाट कमेंट रणवीरच्या फोटोंवर येतायेत.
न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीरविरुद्ध आयपीसी कलम 509, 292, 294, तर आयटी कायद्याच्या अंतर्गत 67अ कलम दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रणवीरवर अटकेची टांगती तलवार असल्यांचं दिसतंय.
आयपीएस कलम 292 अंतर्गत पाच वर्ष आणि 294 अंतर्गत 3 वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. याशिवाय आयटी कायदा कलम 67अ अंतर्गत 5 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.