JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tunisha Sharma Funeral: तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये होणार मोठा खुलासा? आता अंत्यसंस्काराची तयारी

Tunisha Sharma Funeral: तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये होणार मोठा खुलासा? आता अंत्यसंस्काराची तयारी

टीव्ही मालिका अलिबाबा अभिनेत्री तुनिषा शर्माने काल टीव्ही सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जाहिरात

तुनिषा शर्मा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा च्या आत्महत्येच्या बातमीने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. टीव्ही मालिका अलिबाबा अभिनेत्री तुनिषा शर्माने काल टीव्ही सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा को-स्टार शीजान खानला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तुनिषाच्या मृत्यूने तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. तुनिषाने हे टोकाचं पाऊल का उचललं असावं याविषयी अनेक अपडेट समोर येत आहे. अशातच तुनिषाच्या पोस्टमॉर्टम आणि अंत्यसंस्काराविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काल रात्री उशिरा तुनिषाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आला. तुनिषाचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं आहे. तुनिषाच्या पोस्टमॉर्टमवेळी 4-5 डॉक्टर उपस्थित होते. पोस्टमॉर्टमची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. मात्र, मृतदेह अजूनही जेजे रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर काही गैरप्रकार झाला की नाही हे समजू शकेल. त्यामुळे रिपोर्टमधून काय मोठा खुलासा होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रविवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हेही वाचा -  Tunisha Sharma : तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात अटक झालेला शीझान खान आहे तरी कोण? वालीव पोलिसांनी अभिनेत्री तुनिषा शर्माची सहकलाकार शीझान खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी भादंवि कलम 306 अन्वये शीझानवर गुन्हा दाखल केला. शीझान आतापर्यंत तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आलं आहे. भांडणाचे कारण विचारले असता उलटसुलट वक्तव्य करत आहेत.

संबंधित बातम्या

तुनिषा शर्मा प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ‘अलिबाबा नावाच्या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने शोमधील मेकअप रूमच्या स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर आईच्या आरोपाच्या आधारे एफआयआर नोंदवला असून पुढील कारवाई करणार आहे. मृताच्या आईने अभिनेता शीझान खानवर आरोप केले आहेत. आईच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा खून आणि आत्महत्या या दोन्ही कोनातून तपास करणार आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

दरम्यान,  टीव्ही सीरियलशिवाय तुनिषाने फितुर, बार बार देखो, कहानी-2 दुर्गा राणी सिंग आणि दबंग-3 या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. फितुर आणि बार बार देखो मध्ये तुनिषाने लहान कतरिना कैफची भूमिका निभावली होती. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या दबंग-3 मध्येही तुनिषाने छोटी भूमिका केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या