JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Love Story : लग्नाआधी ‘लिव्ह इन’मध्ये होती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दाते

Love Story : लग्नाआधी ‘लिव्ह इन’मध्ये होती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दाते

मालिकेत ‘संस्कारी बहु’ म्हणून मिरवणारी अनिता दाते रिअल लाइफमध्ये मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.

जाहिरात

anita date

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 फेब्रुवारी : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमधील राधिकाची भूमिका साकारणाऱ्या अनिता दातेनं आता सर्वांच्या मनात घर केलं आहे. एक चांगली आई, आदर्श उद्योजिका आणि पत्नी अशा भूमिकेत दिसणाऱ्या अनिता दातेची रिअल लाइफ लव्ह स्टोरी मात्र याच्या बरोबर उलट आहे. मालिकेत ‘संस्कारी बहु’ म्हणून मिरवणारी अनिता दाते रिअल लाइफमध्ये मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका चॅलेंजमध्ये अनितानं तिच्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला आणि त्यानंतर तिची रिअल लाइफ लव्हस्टोरी समोर आली. अनिता दातेचा नवरा चिन्मय केळकर सुद्धा अभिनय क्षेत्राशी संबंधित आहे. या दोघांचं शिक्षणही एकाच कॉलेजमध्ये झालं आहे. दिड वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर अनिता आणि चिन्मय लग्नाच्या बेडीत अडकले.

अनिताला बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती त्यामुळे ती शाळा-कॉलेजच्या नाटक आणि एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. अनिताचा नवरा चिन्मय केळकर हा लेखक असून तो बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत काम करतो. ललित केंद्रात असताना अनिता आणि चिन्मयची ओळख झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं.

चिन्मय आणि अनिता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण चिन्मयला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे त्यानं ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली. त्यानंतर हे दोघंही लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहायला लागले. पण जवळपास दिड वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर दोघांचाही विचार बदलला आणि ते लग्नाच्या बेडीत अडकले. आता या दोघांच्या लग्नाला जवळपास 11 वर्षं झाली आहेत. पण या दोघांमधील प्रेम मात्र पूर्वीएवढंच चिरतरुण आहे आणि याचा प्रत्यय या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टमधून वेळोवेळी येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या