JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक! एक्स मॅनेजरच्या निधनानंतर सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

धक्कादायक! एक्स मॅनेजरच्या निधनानंतर सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)मुंबईत त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)मुंबईत त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळाली नसली. त्याच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतच्या नोकरानं पोलिसांना याबाबत माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसापूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियाननं सुद्धा आत्महत्या केली होती. सुशांत सिंहची एक्स मॅनेजर दिशा सालियाननं काही दिवसांपूर्वीच मलाड येथे एका बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. दिशानं सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. तसेच तिनं ‘फुकरे’ स्टार वरुण शर्मासाठी सुद्धा काम केलं होतं. याव्यतिरिक्त दिशानं कॉमेडियन भारती सिंह आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचीही मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं.

मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एका मागोमाग एक निधन वार्ता ऐकायला येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता मनमीत ग्रेवल आणि प्रेक्षा मेहता यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. लॉकडाऊनमध्ये नैराश्यामुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या सुसाइड नोटवरुन स्पष्ट झालं होतं. मात्र सुशांतनं एवढं टोकाचं पाऊल उचण्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतनं त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. होती. मात्र त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं ते ‘कई पो छे’ या सिनेमातून. ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमानं लोकप्रियतेच्या एका वेगळ्याच शिखरावर नेऊन ठेवलं होतं. अगदी अलिकडच्याच काळात रिलीज झालेला त्याचा छिछोरे हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या