09 एप्रिल : ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेतला अभिनेता शशांक केतकर याचा साखरपुडा झालाय. प्रियांका ढवळे असं शशांकच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. ती वकील आहे. शशांक पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढतोय. अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबतचं त्याचं लग्न आणि नंतर झालेला घटस्फोट बराच गाजला होता. त्याच्या साखरपुड्याचा फोटो अभिनेत्री अमृता खानविलकरनं इंस्टाग्रामवर टाकलाय. शशांकचं ‘गोष्ट तशी गमतीची’ नाटकही बरंच गाजलं. त्याचे परदेशी दौरेही झाले. काही दिवसांपूर्वी शशांकचा वन वे तिकीट हा सिनेमाही येऊन गेला. शशांक आणि प्रियांकाचं लग्न कधी होतेय, याची उत्सुकता फॅन्सना आहे.