JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता इम्रान हाशमीवर दगडफेक; जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग संपल्यानंतर बाहेर पडला अन्

अभिनेता इम्रान हाशमीवर दगडफेक; जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग संपल्यानंतर बाहेर पडला अन्

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या आगामी चित्रपट ‘ग्राउंड जीरो’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 19 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या आगामी चित्रपट ‘ग्राउंड जीरो’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. शूटिंगचं सर्व काम पहलगाम येथे सुरू आहे. मात्र येथे इम्रान हाशमीवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शूटिंग संपल्यानंतर हाशमी सेटच्या बाहेर गेले होते, तेव्हा एकाने त्यांच्यावर दगडफेक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी शूटिंग संपल्यानंतर इम्रान चित्रपटाच्या इतर टीमसोबत पहलगामच्या मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी काही अनोळखी लोकांनी अभिनेत्यासह त्याच्यासोबत इतरांवर हल्ला केला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांविरोधात कलम 147, 148, 370, 336, 323  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनंतनाग पोलिसांनी एका व्यक्तीची ओळख पटवली असून त्याला अटक केली आहे. इम्रान हाशमीचा चित्रपट ग्राऊंड जीरो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF च्या जवानावर आधारित आहे. या चित्रपटातील अधिकतर सीन पहलगाम येथे शूट केले जात आहे. यापूर्वी श्रीनगरमध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होती. यादरम्यान अभिनेता 14 दिवसांपर्यंत श्रीनगर येथे होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या