JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आठशे खिडक्या नऊशे दारं! लॉकडाऊनमध्ये शूट केली नवी मालिका, पाहा VIDEO

आठशे खिडक्या नऊशे दारं! लॉकडाऊनमध्ये शूट केली नवी मालिका, पाहा VIDEO

‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही नवी विनोदी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात सर्व ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्याचा परिमाण मनोरंजन क्षेत्रावर सुद्धा झालेला दिसून आला. अनेक टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद झालं आहे आणि त्यामुळे अनेक मालिकांचे रिपिट टेलिकास्ट सुरू करण्यात आलं आहे. पण अशात सोनी मराठी मात्र प्रेक्षकांसाठी नवी कोरी मालिका घेऊन येत आहे. विशेष म्हणजे ही मालिका लॉकडाऊनमध्ये शूट करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक जुन्या मालिका प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. पण या काळात चक्क एक नवी विनोदी मालिका भेटीला येतेय. आठशे खिडक्या नऊशे दार असं या मालिकेचं नाव असून यातून अनेक मराठी विनोदवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे.

या मालिकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कलाकारांनी घरी बसूनच या मालिकेचं शूटिंग केलंय. आठशे खिडक्या नऊशे दारं ही नवी मालिका लवकरच प्रदर्शित होतेय. यात मंगेश कदम, लीना भागवत, समीर चौघुले, नम्रता गायकवाड, आनंद इंगळे हे कलाकार असतील. एका नव्या कोऱ्या विनोदी मालिकेची ही ट्रीट लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे (संपादन- मेघा जेठे)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या