JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Filmfare Award : गल्ली बॉयने पटकावले सर्वाधिक पुरस्कार, अमृताने शेअर केला धमाल VIDEO

Filmfare Award : गल्ली बॉयने पटकावले सर्वाधिक पुरस्कार, अमृताने शेअर केला धमाल VIDEO

गल्ली बॉय चित्रपटाला सर्वाधिक 13 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. यात मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषलाही उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. अमृताने नुकतच आभार व्यक्त करण्यासाठी व्हिडिओ शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी : हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा 65वा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी गुवाहाटीमध्ये पार पडला. या सोहळ्यात मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषला गल्ली बॉय चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. अमृता सुभाने गल्ली बॉय चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट सोबत स्क्रीन शेअर केली होती. अमृता आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही तितकीच प्रसिद्ध आहे. अमृताने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. अमृताला फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर अमृताने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती, रणवीर आणि चित्रपटातील इतर सहकलाकरा दिसत आहेत. आणि गल्ली बॉय चित्रपटाच यश सर्वजण आनंदात साजरे करताना दिसत आहेत. तर तिने व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, ‘गलीबॉयनं काल आजवर फिल्मफेअरच्या इतिहासांत सर्वात जास्त म्हणजे १३ पुरस्कार मिळवण्याचं रेकॉर्ड केलं. खूप आनंद आणि कृतज्ञ!’.

गल्ली बॉय चित्रपटाने फिल्मफेअर च्या इतिहासात 13 पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे गल्ली बॉय चित्रपटाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. अनेकांनी अमृताचा हा व्हिडिओ शेअर आणि लाईकही केला आहे.

संबंधित बातम्या

अमृताने पुरस्कार मिळताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये अमृताने या पुरस्कारसाठी आभार मानले होते. अमृताला हिंदी चित्रपटासाठी मिळालेला हा पहिला पुरस्कार असल्याने अमृतासोबतच तिचे चाहतेही खूश आहेत. गल्ली बॉय चित्रपट मुख्य अभिनेत्याभोवती फिरणारा असला तरी एक सहाय्यक अभिनेत्रीच्या अमृताच्या भमिकेला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली होती. अमृताचे केवळ चित्रपट नाही तर अनेक नाटकही गाजले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या