**09 डिसेंबर :**अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आज सोमवारी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केला. मुंबईतील मनसेच्या राजगड या मुख्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात प्रवेश केला. अभिनेते महेश मांजरेकर, संजय नार्वेकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची मनसे चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित होते.