17 जुलै : भाग मिल्खा भाग या चित्रपटाचा मनोरंजन कर माफ करावा अशी विनंती चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश मेहरा आणि अभिनेता फरहान अख्तर यांनी केली आहे. आज विधिमंडळात जाऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची त्यांनी भेट घेतली. हा चित्रपट मनोरंजन करमुक्त केला तर जास्ती लोक हा चित्रपट पाहू शकतील असं दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचं म्हणणं आहे. यामधून जे पैसे जमा होतील त्याचा उपयोग राज्यातील खेळाडूंसाठी केला जाईल असंही मेहता यांनी सांगितलं.