रांची, 9 जानेवारी : झारखंडमधील एका हत्येमागील खुलासा झाल्याचा दावा येथील पोलिसांनी केला आहे. पत्रकार अनिल मिश्रा यांचे पूत्र संकेत मिश्रा यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी मोठी माहिती समोर आणली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत संकेत मिश्रा यांचे आपल्या काकीसोबत अवैध्य संबंध होते. 33 वर्षीय काकीनेच घरातील नोकरासोबत मिळून त्याची हत्या केली. या काकीचे घरातील नोकरासोबतही अवैध्य संबंध होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना केलं अटक मिळालेल्या माहितीनुसार मृत संकेत मिश्राने काकीकडून 3000 रुपयांची मागणी केली होती. ज्यानंतर आरोपी काकीने प्रेमघाग पिकनिकच्या ठिकाणी त्याला बोलावलं. यादरम्यान बिरसा काही सामान आणण्यासाठी गेला, त्यावेळी एका गोष्टीवरुन त्याचा काकीसोबत वाद झाला. यादरम्यान नोकरदेखील घटनास्थळी हजर होता. त्याचे संधी पाहून संकेत मिश्रा याच्यावर हल्ला केला. या मारहाणीत धारदार शस्त्राने संकेत मिश्राची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर नोकर बिरसाने स्वत: घाललेली जीन्स आणि जॅकेट काढून पेट्रोलमध्ये भिजवलं आणि मृतदेह जाळून हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. हत्येनंतर छत्तीसगडच्या जसपूर भागात गेले होते आरोपी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात आणखी एक बाब समोर आली आहे. मृतकाच्या मोबाइलवर त्याच्या काकीनेच अनेकदा फोन केले होते. दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा तासनतास गप्पा होत होत्या. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी मृतकाच्या काकीला पोलीस ठाण्यात बोलावलं. मात्र काकी पोलीस स्टेशनला न जाता बिरसासोबत शेजारीला राज्य छत्तीसगडमध्ये पळाली. मात्र पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी सर्व तपासानंतर हत्याकांडाचा केला खुलासा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, या घटनेचं गांभीर्य पाहता एसडीपीओ तोरपा ओम प्रकाश तिवारी यांच्या नेतृत्वात 8 सदस्यीय एसआयटी टीमचं गठण करण्यात आलं. पोलिसांनी सर्व केस गांभीर्याने पाहिली असून मुख्य आरोपी मृत व्यक्तीची काकी आहे. तिला छत्तीसगडमधील जसपूर येथून अटक करण्यात आली आहे. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याशिवाय आरोपींकडून दोन मोबाइल आणि मोटरसायकलदेखील जप्त करण्यात आले आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा शनिवारी अनिल मिश्रा याच्या घरी पोहोचून सांत्वन केलं.