या प्रकरणात तरुणीला सार्वजनिक स्वरुपात जबर मारहाण करण्यात आली, याच शिक्षेदरम्यान तिचा मृत्यू झाला.
लग्नाच्या आधीर शारिरीक संबंध ठेवल्यांमुळे महिलेला दिलेल्या शिक्षेदरम्यान तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना इंडोनेशियातील प्रश्चिमी भागातील आहे. Aceh मधील ल्होकसेउमावे येथे विवाहपूर्व लैंगिक संबंध केल्याच्या आरोपाखाली 100-100 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. Lhokseumawe शहराचं नाव इंडोनेशियातील (Indonesia) सर्वात पुराणमतवादी शहरांमध्ये घेतलं जातं.
येथील स्थानिक लोकांमध्ये शरीया कायद्यातील (Sharia Law) शिक्षेमुळे दहशत निर्माण झाली आहे. येथे विविध गुन्ह्यांसाठी फटके मारण्याची शिक्षा सुनावली जाते. ज्यात दारू पिणे, व्यभिचार, आणि विवाह पूर्व सेक्स करणे वा समलैंगिक संबंध आदी कथित गुन्ह्यांचा समावेश आहे. ही प्रथा एका इस्लामिक कायद्याचा भाग असून ज्यात नैतिकतेवर परिणाम करणाऱ्या कृत्यांवर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जातो.
या प्रकरणात महिलेने विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवल्यामुळे तिला सार्वजनिक रुपात फटके मारण्यात आले होते. यातच महिलेचा मृत्यू झाला. तिचा प्रियकर गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
इंडोनेशियामधून नेहमी अशी प्रकरणं समोर येतात. या प्रकरणात महिलेच्या मृत्यूनंतर आतंरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेने या शिक्षेचा निषेध केला आहे. आणि अशा शिक्षा रद्द करण्याची मागणी आहे. फोटो साभार: (Newsflash)
2018 मध्ये Aceh च्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक फटके मारण्याची शिक्षा बंद करून आरोपींना तुरुंगात पाठविण्याच्या शिक्षेबद्दल विचार करीत असल्याचं सांगितलं होतं, मात्र काही कारणास्तव असं करण्यात आलं नाही.