JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पिंपरीतील धक्कादायक प्रकार! आजी-आजोबाने अल्पवयीन मुलीसमोरच केले अश्लील चाळे

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! आजी-आजोबाने अल्पवयीन मुलीसमोरच केले अश्लील चाळे

अल्पवयीन मुलीसमोर आजी-आजोबाने अश्लील चाळे करत तिला जबरदस्तीने बघायला लावले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी, 7 ऑगस्ट : आपल्या नात्यातील अल्पवयीन मुलीसमोर आजी-आजोबाने अश्लील चाळे करत तिला जबरदस्तीने बघायला लावले. तसंच त्यानंतर बघितलं नाही म्हणून पुन्हा मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पीडीत मुलीच्या काकाने ( मावशीच्या पतीने ) तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात आजी, आजोबा आणि मावशीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वर्ग करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2014 पासून 2020 पर्यंत वेळापूर, पंचशिल नगर व मसवड येथे घडली. फिर्यादी यांची सख्खी आजी व आजोबा यांनी फिर्यादीच्या समोरच शाररीक संबंध प्रस्थापित केले. तसंच ते पाहण्यास फिर्यादीस बळजबरी केली. याला फिर्यादीने नकार दिल्यानंतर तिला मारहाण व शिवीगाळ केली. तसेच पीडीत मुलीचे आजोबा यांनी पीडीत मुलीसोबत शारीरिक अत्याचार केले. ही बाब तक्रार देणाऱ्या फिर्यादीने आजीला सांगितले असता तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तसंच फिर्यादीच्या मावशीचा पती याने पीडीतेला गावाला नेऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे नमुद करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या