जगात असंख्य लोकांनी असंख्य आजारांमुळे आपला जीव गमवला आहे काहींनी अपघातामध्ये आपले प्राण गमावले आहेत, तर काहींनी आत्महत्या करत आपला जीव गमावला आहे.
ठाणे 25 सप्टेंबर: आरटीओ कार्यालयातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केली. मोहंमद सादीक शेख (वय 68) असं या निवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर होती त्यानेच त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने शेख कुटुंबीय हादरुन गेलं आहे. ठाण्यातल्या कॅसलमील भागात ते राहत होते. शेख यांना दारु पिण्याचं प्रचंड व्यसन होतं. त्यातून त्यांना नैराश्याने ग्रासलं होतं. त्यात सध्याच्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे भर पडली होती. त्या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज असल्याची शक्यता राबोडीपोलिसांनी व्यक्त केली आहे. शेख यांच्या व्यवसामुळे त्यांचे कुटुंबातल्या इतर सदस्यांसोबत मतभेद होते. त्यांची पत्नीही वर्षभरापूर्वीपासून वेगळी राहात होती. ते आपल्या मुलासोबत एकटेच राहात होते. दुपारी मुलगा झोपलेला असतांना ते आपल्या खोलीत गेले आणि गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं. मुलगा झोपेतून उठल्यानंतर त्याला हे कळताच प्रचंड धक्का बसला. रोबोडी पोलीस आता घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.