JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / अरे बापरे! पठ्ठ्याने चक्क घराच्या परसबागेत फुलवली गांजाची शेती; पोलिसांच्या नजरेत येताच अशी अवस्था

अरे बापरे! पठ्ठ्याने चक्क घराच्या परसबागेत फुलवली गांजाची शेती; पोलिसांच्या नजरेत येताच अशी अवस्था

परसबाहेत गांजाची शेती पाहून पोलिसांसह स्थानिकदेखील हादरले.

0104

घराशेजारी ज्या जागेत परसबाग फुलवली जाते त्याच जागेत चक्क एका पठ्ठ्याने गांजाची बाग फुलवली आहे. धामणगाव पोलिसांच्या या प्रकरणात गांजाची शेती करणाऱ्या व गांजा विकणाऱ्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

जाहिरात
0204

दत्तापुर धामणगाव येथील आठवडी बाजार परिसरात राहणाऱ्या शेख इस्माईल शेख बाबा या आरोपीने घराशेजारच्या रिकाम्या जागेत जेथे परसबाग लावली जाते तिथे चक्क गांजाची झाडे लावल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

जाहिरात
0304

धामणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाघोली येथील नंदू जयस्वाल नामक तरूण गांजा विक्री करत असल्याची मिळालेल्या माहितीवरून चांदुर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी आज दोन्ही ठिकाणी छापा टाकला.

जाहिरात
0404

यावेळी दोन्ही आरोपीकडून दहा किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे धामणगाव परिसरात आवाज व्यवसाय करणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या