JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / ऑनलाइन गेम्सच्या नादी लागून मुलं घरातून पळाली; मुंबईला जाणाऱ्या तिघांना नाशिकमध्येचं अडवलं

ऑनलाइन गेम्सच्या नादी लागून मुलं घरातून पळाली; मुंबईला जाणाऱ्या तिघांना नाशिकमध्येचं अडवलं

टीनएजर्स अनेकदा भावनेच्या भरात चुकीचं वागतात. असाच एक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 14 फेब्रुवारी : ऑनलाईन गेम्सच्या (online games) जाळ्यात अडकून अनेकदा लहान आणि किशोरवयीन मुलं टोकाचं पाऊल उचलतात. असाच प्रकार नागपूरमध्ये (Nagpur) घडला आहे. ‘फ्री फायर गेम’च्या (free fire game)नादी लागलेली नागपूरमधली तीन शाळकरी मुलं शनिवारी भल्या सकाळी घरून निघून गेली. पालक आणि पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्यानं मुलं रेल्वेतून मुंबईकडं (Going to Mumbai in Railway) जात असल्याचं लक्षात आलं. आरपीएफच्या मदतीनं संध्याकाळी या तिघांना नाशिक रेल्वे स्थानकावर (Nashik railway station) ताब्यात घेतलं गेलं. काही काळ मात्र या पालकांच्या (parents) काळजाचे ठोके चुकले होते. 15, 16, 17 वर्षे वय असलेली तिन्ही मुलं दहावीत शिकतात. ऑनलाईन क्लासच्या (online class) नावाखाली नावाखाली हे तिघंही ‘फ्री फायर’ हा ऑनलाईन गेम खेळत होते. नेहमीप्रमाणंच ही मुलं शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी (morning walk) म्हणून बॅग घेऊन निघाली. मात्र बराच काळ परत आली नाही. त्यामुळं आई-वडिलांनी एकमेकांकडे चौकशी केली. त्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. हेही वाचा प्रेयसीसोबत पळालेल्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल या मुलांपैकी एकानं आपल्या आईला सांगितलं होतं, की आपण ‘फ्री फायर गेमची टूर्नामेंट (game tournament) खेळण्यासाठी मुंबईला जातो आहोत. आईनं त्याला यासाठी मनाईही केली होती. त्यावेळी त्यानं आपण आईचं ऐकलंय असं दाखवलं. सकाळी घरून निघताना या मुलानं बॅगमध्ये कपडे घेऊन गेल्याचं आईच्या लक्षात आलं. त्यानंतर या मुलाचे आई-वडील दुसऱ्या मुलांच्या घरी गेले असता ही मुलंसुद्धा काही कळू न देता कपडे भरून निघून गेली असल्याचं कळालं. आता यानंतर मात्र मुलं पळून गेल्याचा निष्कर्ष या पालकांनी काढला. पालकांनी लगेचच प्रतापनगर पोलीस ठाणं गाठलं. पोलीस पथकाला तातडीनं रेल्वे स्टेशनवर पाठवलं गेलं. नागपूर रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही मुलं हावडा-मुंबई स्पेशल ट्रेनमध्ये बसल्याचं दिसलं. रेल्वे पोलीस, आरपीएफ अधिकाऱ्यांनी अकोला, जळगाव, नाशिक आणि मुंबई रेल्वे पोलिसांना अलर्ट दिला. सायंकाळी गाडी नाशिक स्थानकात थांबताच आरपीएफनं ताब्यात घेतलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या