JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / एकतर्फी प्रेमाच्या वेडानं घेतला जीव; विवाहित तरुणीने 7 व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:ला संपवलं

एकतर्फी प्रेमाच्या वेडानं घेतला जीव; विवाहित तरुणीने 7 व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:ला संपवलं

आरती पती व मुलासोबत आनंदात होती, मात्र तो त्रास ती सहन करू शकली नाही आणि तिने स्वत:चाच जीव घेतला.

0106

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकरासोबत लग्नासाठी दबाव आणि धमकीमुळे त्रस्त झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भूदरापुरा येथे राहणारे चंदूभाई परमार एका गॅरेजमध्ये काम करतात. त्यांची मुलगी आरती हिचं पाच वर्षांपूर्वी अरावली येथील निवासी विष्णूभाई याच्यासोबत लग्न झालं होतं.

जाहिरात
0206

आरतीच्या सासरी राहणारा एका तरुण तिचा पती घरी नसताना आरतीला त्रास देत असे. अनेकदा तो आरतीवर जबरदस्तीही करीत होता. आरती आपला पती आणि मुलांसह अहमदाबाद येथे राहायला आली होती. दोघे आपल्या मुलासह सिंधुभवन रोड येथे राहत होते. दिनेश याला आरती अहमदाबादमध्ये राहायला गेल्याचं कळताच तोदेखील अहमदाबाद येथे आला व वराज येथे भाड्याने घर घेऊन राहू लागला.

जाहिरात
0306

काही दिवसांपूर्वी दिनेश जेव्हा तिथे आला तेव्हा आरती आपल्या वडिलांच्या घरी होती. यानंतर दिनेश तिच्या वडिलांच्या इमारतीखाली गेला व आरतीला खाली बोलावलं. त्याने आरतीला सोबत येण्यास सांगितलं. अन्यथा पती आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा तिच्या पतीला याबाबत कळालं, त्यानंतर त्याने आरतीच्या वडिलांना याबाबत कळवलं.

जाहिरात
0406

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरतीने सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दिनेश याच्याविरोधात आत्महत्येसं प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
0506

आरतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात
0606

एकतर्फी प्रेमाला वैतागून आरतीने सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या