test
रांची, 14 डिसेंबर : अनेक जण हे लाखो रुपये कमावतात. पण महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांचे पैसे संपतात आणि अनेकदा त्यांना कर्ज काढायची गरज पडते. त्यामुळे इतके पैसे कमावल्यावरही अशी परिस्थिती का येते, हा आणखी एक प्रश्न निर्माण होतो. तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या पाकिट किंवा पर्समध्ये कोणतीही फालतू वस्तू ठेवल्याने लक्ष्मी माता नाराज होते. यामुळे, कमाई करूनही तुमची पर्स अनेकदा रिकामी राहते आणि पैसे टिकत नाहीत.
झारखंडच्या रांची येथील अग्रवाल रत्न स्टोरचे ज्योतिष आचार्य संतोष कुमार चौबे यांनी याबाबत लोकल18 शी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले की, बरेचदा असे दिसून येते की, लोक कमाई करूनही पैसे वाचवू शकत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे, अनेक वेळा लोक अनावश्यक वस्तू त्यांच्या पर्समध्ये ठेवतात किंवा जुनी, खराब झालेली किंवा फाटलेली पर्स वापरतात. म्हणून पर्समध्ये काही गोष्टींची काळजी घेतली तर पैसा बराच काळ टिकतो.
या वस्तू चुकूनही ठेऊ नका -
ज्योतिष आचार्य संतोष हे म्हणाले की, पर्समध्ये चुकूनही औषधाची बिले किंवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन ठेवू नका. अशा वस्तू ठेवल्याने लोकांचा खर्च अनेकदा वाढतो. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, जी वस्तू तुम्ही तुमच्याजवळ ठेवता, निसर्ग तुम्हाला तशाच वस्तू देतो. याशिवाय अनेक दिवसांपासून पडून असलेली फाटलेली जुनी स्लिप किंवा एटीएम स्लिप यांसारख्या गोष्टी तत्काळ काढून फेका.
यासोबतच, याशिवाय फाटलेली जुनी पर्स कधीही ठेवू नका. पर्सच्या स्थितीचाही तुमच्या ग्रहावर खूप परिणाम होतो. फाटलेली जुनी पर्स ठेवल्यास शुक्र ग्रह अशुभ होतो. शुक्र ग्रह वैभव, ऐश्वर्य आणि शाही जीवन देण्याचे काम करतो. अशा स्थितीत या ग्रहाची स्थिती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे आर्थिक अडचण आणि गरिबीसारखी परिस्थिती उद्भवू शकते.