JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / दीप सिद्धूने लाल किल्ल्यावरील हल्ल्याचा कसा आखला प्लान? चौकशीत धक्कादायक कबुली

दीप सिद्धूने लाल किल्ल्यावरील हल्ल्याचा कसा आखला प्लान? चौकशीत धक्कादायक कबुली

त्याने शेतकरी आंदोलनातील स्वयंसेवकांचे काही जॅकेट चोरण्यासही सांगितलं होतं. याशिवाय तो 28 नोव्हेंबरला दिल्लीत झालेल्या एका रॅलीतही सहभागी झाला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: प्रजासत्ताक दिनी (Republic Day) 26 जानेवारी रोजी काही शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर हल्ला (Attack on red fort) केला होता. या हिंसक शेतकरी आंदोलकाच्या गटाचं नेतृत्व करणारा म्होरक्या दीप सिद्धूला (Deep sidhu) नुकतंच अटक करण्यात आलं आहे. त्याने आपल्या चौकशीत लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना कशी आखली होती, याचा खुलासा केला आहे. पण तो कोणत्याही कट्टरपंथी संघटनेसाठी काम करत नाही, असं त्याने पोलीस चौकशीत स्पष्ट केलं आहे. पोलीस चौकशीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. त्याने सांगितलं की, शेतकऱ्यांप्रती भावुक होऊन या आंदोलनात सहभाग घेतला होता. लॉकडाऊनमध्ये आणि नंतरच्या काळात हाताला काही काम नव्हतं. त्याचवेळी ऑगस्टमध्ये पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तोही या आंदोलनाकडे आकर्षित झाला आहे. दीप सिद्धूने पुढे सांगितलं की, तो ज्यावेळी आंदोलनाच्या स्थळी जायचा, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात युवक यायचे. याचा फायदा घेवून त्याने आपल्या काही समर्थकांच्या मदतीने पोलिसांनी आखून दिलेला नियोजीत मार्ग तोडण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी त्याने शेतकरी आंदोलनातील स्वयंसेवकांचे काही जॅकेट चोरण्यासही सांगितलं होतं. याशिवाय तो 28 नोव्हेंबरला दिल्लीत झालेल्या एका रॅलीतही सहभागी झाला होता. हे ही वाचा- तीन दिवस बँका राहणार बंद; पुढील आठवड्यात संपामुळे कामकाज ठप्प होणार दीप सिद्धूने आधीच रचला होता कट दीप सिद्धूने प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधीच लाल किल्ला आणि इंडिया गेटपर्यंत जाण्याचा प्लॅन केला होता. पण 26 जानेवारी रोजी तो केवळ लाल किल्ल्यापर्यंतच जावू शकला. फरार आरोपी जुगराज सिंह याला खास धार्मिक ध्वज फडकवण्यासाठीच आणण्यात आलं होतं असंही पोलीस चौकशीत दीप सिद्धू याने सांगितलं आहे. असं म्हटलं जात आहे की, जुगराज हा तरनतारन येथील रहिवाशी असून तो गुरुद्वारांमध्ये ध्वज फडकवायचं काम करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या