JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / धक्कादायक! देशातील प्रथम ट्रान्सजेंडर RJ आणि विधानसभेच्या उमेदवार अनन्या कुमारीची आत्महत्या

धक्कादायक! देशातील प्रथम ट्रान्सजेंडर RJ आणि विधानसभेच्या उमेदवार अनन्या कुमारीची आत्महत्या

ट्रान्सजेंडर समाजातून विधानसभा निवडणुकीत भाग घेणारी ती पहिली ट्रान्सजेंडर होती.

0104

केरळ विधानसभा निवडणुकीतील प्रथम ट्रान्सजेंडर उमेदवार अनन्या कुमारी ही राज्यातील पहिली रेडिओ जॉकी (ट्रान्सजेंडर आरजे अनन्या कुमारी अलेक्स) तिच्या घरी मृत अवस्थेत आढळली आहे. तिचा मृतदेह कोची येथील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. यापूर्वी अनन्या म्हणाली होती की, “सेक्स बदलण्याच्या शस्त्रक्रियेमुळे ती गंभीर आरोग्याच्या समस्यांशी झगडत आहे.”

जाहिरात
0204

अनन्याची 2020 मध्ये कोची येथील खासगी रूग्णालयात लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाली होती. तिला उभं राहायला त्रास होत होता. अनन्या म्हणाली होती की, 'शारीरिक समस्यांमुळे तीही काम करू शकत नाही. ऑपरेशन दरम्यान झालेल्या बदलामुळे ती त्रस्त आहे. त्यानंतर ती घरातच मृत सापडली. तिचा मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

जाहिरात
0304

असं म्हटलं जातं की, अनन्याने तिच्या स्वतःच्या शारीरिक त्रासामुळे आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. केरळमधील ट्रान्सजेंडर समाजातून विधानसभा निवडणुकीत भाग घेणारी ती पहिली ट्रान्सजेंडर होती. केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी प्राणघातक धमक्या मिळाल्यानंतर तिने निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली होती.

जाहिरात
0404

निवडणुकीपूर्वी डेनॉक्रॅटिक सोशल जस्टिस पार्टीचे नेते तिला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप अनन्याने केला होता. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी पोस्टर लावण्यास नकार दिला आणि स्वतःला मारण्याची धमकी दिली होती. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा मतदारसंघातून अनन्याने उमेदवारी दाखल केली होती. मतदार संघात पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते आणि डाव्या पक्षाच्या (एलडीएफ) ज्येष्ठ नेत्याने अर्ज दाखल केला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या