नवी दिल्ली, 25 एप्रिल : लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच घरात बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे घरगुती वादाला तोंड फुटलं आहे. अशात हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये घरगुती कलहाची हृदयद्रावक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या वृद्ध दांपत्याची चाकू आणि स्क्रूडायव्हरनं हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर मृत जोडप्याचा मुलगा आणि सून यांच्यावर पोलिसांचा संशय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध पती पत्नीच्या अंगावर चाकूचे वार आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे. हत्येसाठी चाकू आणि स्क्रूडायव्हर वापरल्याचं पोलीस सांगत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास पोलिसांना पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये कॉलरनं एका घरात दोन लोकांच्या हत्येची बातमी दिली. दिल्लीतलाय दीनपूर, चावला येथील दुर्गा विहार फेज-2मध्ये ही घटना घडली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जे पाहिलं ते धक्कादायक होतं असं पोलिसांनी सांगितलं. राज सिंह (61) आणि त्यांची पत्नी ओमवती (58 58) यांचा मृतदेह आतल्या खोलीत पलंगावर पडलेला आढळला. दोघांचं डोकं आणि चेहरा चाकू आणि स्क्रूड्रायव्हरनं भोसकला होता. संपूर्ण घरात रस्काचा पाठ वाहत होता. पूर्ण प्लानिंगसह डबल मर्डर? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचा जावई आपल्या दोन मुलांसह घटनास्थळी उपस्थित होता. याच कारणास्तव संपूर्ण नियोजन करुन ही दुहेरी हत्या झाल्याची शक्यताही पोलीस व्यक्त करत आहेत. खून करूनही या दोघांनी पोलिसांना बोलावलं नाही. उलट पीसीआर कॉल या जोडप्याच्या मुलीनं केला होता. शेजारी कोणालाही घरातून ओरडल्याचा आवाज आला नाही. मुलांना याबद्दलही काही माहिती नव्हतं. अशा परिस्थितीत वृद्ध जोडप्यास बेशुद्ध करण्यासाठी काही मादक पदार्थ पाजले असावे असा पोलिसांचा संशय आहे. हाती लागलेल्या सगळ्या माहितीनुसार पोलीस हत्येचा तपास करत आहेत. ही हत्या नेकमी का झाली आणि ऐवढ्या निर्दयीपणे जोडप्याला कोणी मारलं याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस शेजाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.