JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / क्राईम / SHOCKING! नोकरी करते म्हणून आधी चाकूनं काढले डोळे आणि नंतर झाडली गोळी; महिला पोलिसावर क्रूर हल्ला

SHOCKING! नोकरी करते म्हणून आधी चाकूनं काढले डोळे आणि नंतर झाडली गोळी; महिला पोलिसावर क्रूर हल्ला

तीन महिन्यांपूर्वीच ही महिला पोलीस अधिकारी म्हणून रूजू झाली होती.

0105

33 वर्षांच्या खटेरा या महिला पोलिसावर क्रूर असा हल्ला करण्यात आला आहे. नोकरी करते म्हणून आधी चाकूनं तिचे डोळे काढून तिला आंधळं केलं आणि त्यानंतर तिच्यावर गोळी झाडली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं ज्यामुळे तिचा जीव वाचला आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

जाहिरात
0205

रॉयटर्सच्या वृत्तानुसार खटेरा ही गजनी प्रांतातील एका पोलीस  ठाण्यात नोकरी करते. तीन महिन्यांपूर्वीच क्राईम ब्रांचमध्ये अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

जाहिरात
0305

हल्ल्याबाबत सांगताना खटेरा म्हणाल्या, मला पोलीस अधिकारी होऊन फक्त तीन महिने झाले आहेत आणि माझ्यावर असा हल्ला करण्यात आला आहे. आपले वडील आपल्या नोकरीच्या विरोधात होते. अनेकदा ड्युटीवर जाताना ते आपल्या मागून यायचे. त्यांनी जवळच्या परिसरातील तालिबानशी संपर्क करून मला नोकरीवर जाण्यापासून रोखण्यास सांगितलं होतं, असं या पोलीस महिलेनं सांगितल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

जाहिरात
0405

गजनी पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्लामागे तालिबानचा हात आहे. खटेराच्या वडिलांनाही हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

जाहिरात
0505

तालिबानी संघटनेला यासाठी जबाबदार मानलं जातं आहे, मात्र या संघटनेनं नकार दिला आहे. या प्रकरणाबाबत आपल्याला माहिती होती मात्र हा कौटुंबिक वाद होता, त्यामुळे यात आपल्याला सहभागी व्हाययचं नव्हतं, असं तालिबानच्या प्रवक्त्यानं सांगितलं. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या