काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)
हिसार, 07 एप्रिल: एका 60 वर्षीय निवृत्त शिक्षकाने आपल्याच शाळेतील 19 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकानं गेल्या पाच वर्षांपासून पीडित विद्यार्थिनीला अनेकदा आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून पीडित मुलीनं याबाबतची माहिती पालकांना दिल्यानंतर आरोपी शिक्षकाचं काळंबेर बाहेर आलं आहे. या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. संबंधित आरोपी शिक्षकाचं नाव राजबीर असून तो सरकारी शाळेत चित्रकलेचा विषय शिकवतो. ही घटना हरियाणातील हिसार जिल्ह्यातील आहे. हांसीजवळील एका गावात राहणाऱ्या 19 वर्षीय युवतीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पीडित युवती एका सरकारी शाळेत शिकत आहे. तिने आपल्या शाळेत चित्रकला विषय शिकवणाऱ्या एका शिक्षकाविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 60 वर्षीय आरोपी शिक्षक दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाला आहे. पण तो 2015 साली ज्या शाळेत शिकवण्याचं काम करत होता, त्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या हवसचा शिकार बनवत होता. निवृत्त झाल्यानंतर केलं अपहरण गेल्या पाच वर्षांपासून आरोपी शिक्षकानं अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केले आहे. आता नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतरही त्याने युवतीवर शारीरिक अत्याचार सुरू ठेवले होते. आरोपी शिक्षकानं अलीकडेच पीडितेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. (हे वाचा - लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, 2 मुलींवर आली वेश्या व्यवसायाची नामुष्की, वसईतील घटना ) गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार सहन करणाऱ्या पीडित मुलीनं अखेर आरोपी शिक्षकाच्या तावडीतून स्वत: ची सुटका करून घेतली आहे. तिने तिच्या घरी जाऊन आणि कुटुंबीयासमोर तिच्यासोबत होतं असलेल्या शोषणाची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. पीडितेनं तक्रारी दाखल केल्यानंतर, पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो, एससी-एसटी कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.