JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / WHO च्या विधानाने खळबळ! कोरोना मृत्यूंची खरी आकडेवारी आहे फार मोठी

WHO च्या विधानाने खळबळ! कोरोना मृत्यूंची खरी आकडेवारी आहे फार मोठी

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत जगात 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 मे : देशात सध्या कोरोना परिस्थिती (Corona in India) बिकट आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या सध्या झपाट्यानं कमी होत असली तरी मृतांचा आकडा आजही चिंताजनक आहे. सरकारी आकडेवारीनुसार या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना मृतांची संख्या वाढलेली दिसते. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनामुळं झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीच्या या काळात कोरोनामुळं होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही. सरकारी आकडेवारीनुसार जे आकडे आपल्यासमोर येत आहेत त्यापेक्षा कित्येक अधिक रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या  (WHO)  म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत जगात 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जारी करताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे वर्ष 2020 मध्येच जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जगातील विविध देशांनी केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी 12 लाखाच्या आसपास आहे. कोरोनामुळं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र, या सर्वच आकडेवारीची आपल्याकडं नोंद झालेली नाही. अनेक ठिकाणाहून समोर येणारे आकडे प्रत्यक्षात खूप मोठे असल्याची भीती आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. हे वाचा -  संकटाच्या काळात मुंबईच्या डबेवाल्यांना मिळाला आधार, रेस्टॉरंट्ससोबत केला करार मे 2021 पर्यंत कोरोनामुळं 34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ही सरकारी आकडेवारी असून खरी संख्या दोन ते तीन पट अधिक असण्याची दाट शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या असिस्टट डायरेक्टर-जनरल (डेटा आणि अॅनालिटिक्स विभाग) समीरा आसमा यांनी सांगितले. हे वाचा -  देवेंद्रजी काय राव…तुमच्यामुळं मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं! कोकण दौऱ्यावरून चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर टीका त्या म्हणाल्या की, आपल्या दिसत असलेल्या आकडेवारीपेक्षा खरे आकडे दोन ते तीन पट अधिक आहेत. त्यामुळं माझ्या मते आत्तापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दुसऱ्या आणि पहिल्या महामारीतही अनेक ठिकाणी रुग्णांना दवाखाने आणि खाट उपलब्ध होऊ शकत नव्हते, तेवढी आरोग्य व्यवस्थाच नव्हती. त्यावेळी नोंदीपेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत. WHO चे डेटा अॅनालिस्ट विलियम मेसेम्बूरी यांनीही आसमा यांच्या मताला दुजोरा दिला असून त्यांनी सर्वच मृतांची नोंद झालेली नसून खरे आकडे वेगळेच असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या