JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / प्रत्येक कोरोनामुक्त व्यक्ती कोरोनाग्रस्तांसाठी करू शकत नाही रक्तदान, 'या' आहेत अटी

प्रत्येक कोरोनामुक्त व्यक्ती कोरोनाग्रस्तांसाठी करू शकत नाही रक्तदान, 'या' आहेत अटी

कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा (coronavirus patient blood plasma) देऊन कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात, मात्र सर्वच कोरोना मुक्त व्यक्तींचं रक्तदान (blood donation) होऊ शकत नाही. यामागे काही कारणं आहेत.

0113

इम्युनोलॉजी तज्ज्ञ डॉ. स्कंद शुक्ल यांनी सांगितलं, जर कोरोनाव्हायरसमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीला प्लाझ्मा देऊन दुसऱ्या रुग्णाला बरं करण्यात मदत करायची असेल तर सर्वात आधी रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन तपासलं जातं. जर हिमोग्लोबिन 12.5 ग्रॅम प्रति डेसीलीटर नसेल तर त्याचे प्लाझ्मा घेतले नाही जात. वजनही महत्त्वाचं आहे.

जाहिरात
0213

रक्तदानासाठी त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशरही नियंत्रणात असणं गरजेचं आहे.

जाहिरात
0313

18 पेक्षा कमी आणि  60 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचंही रक्त घेतलं जात नाही.

जाहिरात
0413

कोरोनातून बरा झालेला रुग्ण हेपेटायटिस, डायबेटिज रुग्ण असेल, हेपेटायटिस सी किंवा अँटि-रेबीजवर  वर्षात उपचार घेतलेत, तरीदेखील ते रक्तदान नाही करू शकत.

जाहिरात
0513

एखाद्या व्यक्तीने महिनाभरात कोणत्याही प्रकारची लस घेतली असेल तर त्याचे प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी नाही घेता येत.

जाहिरात
0613

जर एखाद्या व्यक्तीने रक्तदानाच्या 72 तासांपूर्वी अॅस्प्रिन घेतलं असेल किंवा दातांची ट्रिटमेंट केली असेल तरीदेखील ते रक्त देऊ शकत नाही.

जाहिरात
0713

ज्या व्यक्तींनी गेल्या 6 महिन्यांत शरीरावर टॅटू काढला आहे किंवा कान टोचलेत त्यांचंही रक्त घेतलं जात नाही.

जाहिरात
0813

महिलांना पीरियड्सदरम्यान आणि त्याच्यानंतर काही दिवस रक्तदान न करण्याचा सल्ला दिला असतो.

जाहिरात
0913

स्तनपान करणाऱ्या महिलेचंही रक्त घेऊ शकत नाही.

जाहिरात
1013

क्रिटिकल केअर एक्सपर्ट डॉ. राजेंद्र यांनी सांगितलं, रुग्णाच्या शरीरातील व्हायरस लोडही महत्त्वाचा आहे. जर एखाद्या कोरोना रुग्णाच्या शरीरात व्हायरसचा लोड जास्त नसेल तर तो बरा झाल्यानंतरही त्याच्या शरीरातील प्लाझ्मा नाही घेतले जात कारण त्यातील अँटिबॉडीज दुसऱ्या रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढू शकणार नाहीत.

जाहिरात
1113

बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज दुसऱ्या रुग्णाला व्हायरसशी लढण्यासाठी आणि लवकर बरं होण्यासाठी मदत करतात. काही रुग्णांमध्ये हा अँटीबॉडीज काही काळासाठी तयार होत असतात तर काही रुग्ण बरे झाल्यानंतर या अँटीबॉडीज बनणं बंद होतं. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज बनणं बंद झालं आहे किंवा व्हायरसशी लढण्यासाठी कमजोर आहेत, तर अशा रुग्णांचे प्लाझ्मा दुसऱ्या रुग्णांसाठी फायद्याचे नाहीत.

जाहिरात
1213

नोएडाच्या रोटरी ब्लड बँकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. वीके स्मिथ यांनी सांगतिलं, कोरोना रुग्णातील व्हायरल लोड, अँटिबॉडीज तपासून तो रुग्ण रक्तदान करण्यायोग्य आहे की नाही हे डॉक्टर तपासतील त्यानंतर हिमोग्लोबीन, वजन अशाप्रकारे सामान्य रक्तदानासाठी आवश्यक असलेल्या अटी अनिवार्य असतील आणि त्यानंतर त्याचं रक्त घेतलं जाईल.

जाहिरात
1313

जर एखाद्या व्यक्तीने 3 महिन्यात रक्तदान केलं असेल तर त्याचे प्लाझ्मा नाही घेतले जात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या