JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Delta plus, Third wave च्या संकटात लसीकरणाचा वेग घटला; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Delta plus, Third wave च्या संकटात लसीकरणाचा वेग घटला; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

60 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण आता लक्षणीयरित्या घटलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जून : एकिकडे डेल्टा प्लसचं (Delta plus) संकट, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona third wave) धोका, यात कोरोनाला रोखण्यात सर्वात प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे कोरोना लसीकरण (Corona vaccination). पण आता या लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 60 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचा लसीकरण (60+ Corona vaccınation) आता लक्षणीयरित्या घटलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका 60 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना होता, त्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सनंतर ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात आली. सुरुवातीला उच्च स्तरावर असलेलं या वयोगाटील लसीकरण गेल्या काही आठवड्यांपासून मंदावला आहे. 13 मार्च ते 2 एप्रिल दर आठवड्याला सरासरी 80.77 लाख लशीचे डोसे 60 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांना देण्यात आले. पण 5 जून ते 25 जूनदरम्यान हा आकडा 32 लाखांवर आला आहे. भारतात 60 पेक्षा जास्त वयाचे 14.3  नागरिक असण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत 2.29 कोटी नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. म्हणजे त्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहे. तर 6.71 कोटी लोकांनी कोरोना लशीचा फक्त एकच डोस घेतला आहे.  याचा अर्थ फक्त  16 टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकऱणाचा वेग मंदावला आहे, याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. लसीकरण केंद्रावर जाण्याची गैरसोय आणि लशीबाबत चुकीची माहिती याला तज्ज्ञांनी कारणीभूत ठरवलं आहे. 60 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाचा वेग मंदावल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘द कोलिशन फॉर फूड अँड न्यूट्रिशन सिक्योरिटी’ (सीएफएनएस) चे कार्यकारी संचालक डॉ. सुजीत रंजन यांनी सांगितलं, कोरोना लशीबाबत गैरसमजूती, अफवा आणि चुकीची माहिती लसीकरणात सर्वात मोठा अडथळा आहे. काही लोकांना वाटतं की त्यांना कोरोना कधीच होणार नाही. शिवाय वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकारण्यात आलेल्या लशींवर अविश्वास आणि प्रश्नचिन्हंसुद्धा एक कारण आहे. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ रुग्णालयाचे संस्थापक संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी सांगितलं, लसीकरणाबाबत वयस्कर लोकांच्या मनातील भीतील एक कारण आहे. याशिवाय या नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत येण्याचाही मोठा प्रश्न आहे. कारण ते स्वतःहून लसीकरण केंद्रावर जाण्यात सक्षण नाही. गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर त्यांना कोरोना होईल अशी भीतीसुद्धा असते. त्यामुळे त्यांना घरीच लस देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या