JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / सरकार कोरोना मृत्यूंचे आकडे लपवतंय! रशियन मॉडेलच्या या शवागृहातल्या VIDEO ने उडवली खळबळ

सरकार कोरोना मृत्यूंचे आकडे लपवतंय! रशियन मॉडेलच्या या शवागृहातल्या VIDEO ने उडवली खळबळ

रशियामध्ये कोरोना (Corona) मृतांचे आकडे लपवले जात आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. पूर्व रशियामध्ये एका मॉडेलने शूट केलेल्या व्हिडीओमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

समारा, 17 नोव्हेंबर: जगभरात सर्वच नागरिक कोरोनामुळे (Corona) त्रस्त आहेत. कोरोनावर लस (Corona Vaccine) लवकरात लवकर मिळावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. रशिया मात्र कोरोनाचे आकडे लपवत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्व रशिया परिसरातील एका मॉडेलच्या वडिलांचा मृत्यू झाला. ओल्गा असं या मॉडेलचं नाव आहे. ज्यावेळी ती आपल्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शवगृहात (Mortuary) गेली त्यावेळी तिला अक्षरक्ष: मृतदेहांचा खच पडलेला दिसला. समारा सिटीमध्ये 7 लोकांचाच मृत्यू झाला आहे अशी माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली होती. पण तिकडच्या हॉस्पिटलमधील चित्र काही वेगळंच सांगत आहे. मॉडेलला तिथल्या परिस्थितीवर विश्वास बसला नाही. त्यावेळी तिने वॉर्डबॉयला याबद्दल विचारणा केली. त्यांनी सांगितलं की कोरोनामुळे या शहरात 50 पेक्षा जास्त लोकांनी प्राण गमवले आहेत. या मॉडेलने तिथल्या परिस्थितीचा एका व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरकारी आकड्यांपेक्षा 3 पट जास्त मृत्यू? रशिया जे आकडे जाहीर करत आहे त्यापेक्षा 3 पट जास्त कोरोना मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ओल्गा म्हणाली, तिचे वडील कोरोना रुग्णांना ने आण करणाऱ्या रुग्णवाहिकेचे चालक होते. त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली. रशिया कोरोना मृतांचे आकडे लपवत आहे हे दाखवणारी ही पहिलीच घटना नाही. रशियाच्या एका निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यानेही याआधी असाच आरोप केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या