JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाचा भयंकर परिणाम! कोविड रुग्णांना Rectal bleeding ची समस्या, Cytomegalovirus मुळे एकाचा मृत्यू

कोरोनाचा भयंकर परिणाम! कोविड रुग्णांना Rectal bleeding ची समस्या, Cytomegalovirus मुळे एकाचा मृत्यू

5 कोरोना रुग्णांच्या मलमार्गातून रक्तस्राव (Rectal bleeding) होत असल्याचं दिसून आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जून :  कोरोनामुळे रुग्णांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. श्वास घ्यायला त्रास होतं, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणं, अशा समस्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पण आता मात्र कोरोना रुग्णांमध्ये गंभीर अशी समस्या दिसून आली आहे. रुग्णांच्या मलमार्गातून रक्तस्राव (Corona patient Rectal bleeding) होतो आहे. यामुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. भारतात मलमार्गातून रक्तस्राव होणारे पाच कोरोना रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांना साइटोमेगालो व्हायरस (Cytomegalovirus) झाल्याचं निदान झालं. अयामध्ये मलमार्गातून रक्तस्राव   होतो. कोरोनाचं निदान झाल्यानंतर 20 ते 30 दिवसांनी या रुग्णांना अशी समस्या जाणवली. आतापर्यंत ट्रान्सप्लांट झालेल्या, कॅन्सर किंवा एड्स झालेल्या अशा इन्युनोकॉम्प्रोमाइझ रुग्णांना ही समस्या होत होती. पण पहिल्यांदाच कोविड इम्युनोकमेटेन्ट रुग्णांमध्ये हे आढळून आलं आहे. भारतातील हे पहिलं प्रकरण आहे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. रुग्णालयातील डॉ. अनिल अरोरा यांनी सांगितलं, एप्रिल-मे दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही CMV इन्फेक्शनची पाच प्रकरणं पाहिली. कोरोना झालेल्या इम्युनोकम्पेंटन्चं रुग्णांमध्ये हे इन्फेक्शन दिसून आलं. या रुग्णांना ओटीपोटीत दुखत होतं आणि शौच करताना मलमार्गातून रक्तस्राव होत होता. 30-70 वयोगटातील हे रुग्ण आहेत. चौघांच्या मलातून रक्त पडत होतं तर एकाला आतड्यांची समस्या होती.  त्यापैकी दोघांचा खूप रक्तस्राव होत होता. एका रुग्णाच्या उजव्या बाजूच्या कोलनची सर्जरी करण्याची गरज होती. एका रुग्णाने कोरोनासंबंधित इतर समस्यांमुळे मृत्यू झाला. एकाला सर्जरीची गरज पडली. तर इतर तिघांना अँटिव्हायरल औषध देऊन उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, कोरोना संक्रमण आणि त्यावर उपचारासाछी दिलं जाणारं औषध विशेषत: स्टेरॉइड रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी दाबून ठेवतं आणि त्यामुळे असमान्य संक्रमण होण्याचा धोका वाढतो. त्यापैकीत एक म्हणजे साइटोमेगालो व्हायरस आहे. 80 ते 90 टक्के भारतीय लोकसंख्येत हा व्हायरस आहे. पण आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असल्याने त्याची लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमडोर आहे. त्यांच्यामध्ये याची लक्षणं दिसून येतात. या पाचही प्रकरणात सर्व रुग्णांचा  लिम्फोसाइट काउंट लो होता. (सामान्यपणे 20 से 40 टक्के असतो. या रुग्णांमध्ये 6-10 टक्के होता) . कोरोनामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती आणि त्यांना सीएमव्ही झाल्याचं हे लक्षणं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या