JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Vaccine Side Effects: काही देशांनी लशीचा वापर बंद केल्यानंतर आता भारतही कोव्हिशिल्डचे साइड-इफेक्ट्स तपासणार

Vaccine Side Effects: काही देशांनी लशीचा वापर बंद केल्यानंतर आता भारतही कोव्हिशिल्डचे साइड-इफेक्ट्स तपासणार

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि Astrazenca कंपनी यांनी विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशीचे साइड-इफेक्ट्सच्या काही देशांत नोंदले गेले. त्याची दखल अनुषंगाने सखोल अभ्यास करून आढावा घेतला जाणार असल्याचं केंद्र सरकारने शनिवारी (13 मार्च) जाहीर केलं.

जाहिरात

Covid - 19 vaccine

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 13 मार्च: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford) आणि अॅस्ट्राझेन्का (Astrazeneca) कंपनी यांनी विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशीच्या (Corona Vaccine side effects) साइड-इफेक्ट्सच्या अनुषंगाने सखोल अभ्यास करून आढावा घेतला जाणार असल्याचं केंद्र सरकारने शनिवारी (13 मार्च) जाहीर केलं. ही लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याच्या काही घटनांनतर काही देशांनी या लशीचा वापर थांबवला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने(centrel government) हा निर्णय जाहीर केला आहे. ही (Covishield Vaccine side effects) लस भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. दरम्यान, भारतात (india)ही लस घेतलेल्या कोणालाही अद्याप असा त्रास झाल्याचं वृत्त नाही, असं एएफपीने(AFP) म्हटलं आहे. ‘लाइव्ह मिंट ’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ही लस घेणाऱ्या काही व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या (Blood Clotting) झाल्याचं आढळल्यानंतर डेन्मार्क (Denmark), नॉर्वे (Norway), आइसलँड (Iceland) आणि थायलंड (Thailand) या देशांनी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीपासून भारतातल्या सिरम इन्स्टिट्यूटने (SII) कोव्हिशिल्ड (Covishield) ही लस विकसित केली आहे. लशींचे जगातले सर्वांत जास्त डोस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने अॅस्ट्राझेनेकासोबत करार करून एक अब्ज डोसनिर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ‘ही लस दिलेल्या व्यक्तींवर काही विपरीत परिणाम होत आहे का, यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काही काळजीचं कारण आढळल्यास थांबण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असं कोविड  संदर्भातल्या राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य एन. के. अरोरा यांनी सांगितलं.

Corona Vaccine side Effects : लस घेतल्यानंतर काय होतं? लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

संबंधित बातम्या

 ‘सध्या तरी काळजीचं काही कारण दिसत नाही. कारण भारतात लशीचा विपरीत परिणाम झाल्याचं प्रमाण अगदी कमी आहे. विपरीत परिणाम झाल्याच्या ज्या काही घटना घडल्या आहेत, त्यात रक्तात गुठळ्या होण्याची समस्या आढळली होती का, हे पुन्हा तपासलं जाईल,’ असं अरोरा यांनी सांगितलं.

‘या संदर्भातल्या कालपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर देशभरात 59 ते 60 मृत्यू झाले आहेत आणि त्यामागे अन्य काही कारणंही असावीत. एकदा त्याबाबतीतला तपास पूर्ण झाला, की ही माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर खुली करण्यात येईल,’ असंही अरोरा यांनी सांगितलं. (हे वाचा:   रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस, ट्वीट करत इतरांसाठी लिहिला खास संदेश ) सिरमचं कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेलं कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशींना भारताने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर भारताचा लसीकरण कार्यक्रम (Vaccination Drive) सुरू झाला होता. आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतले कोरोना योद्धे यांच्यासह एकूण 16 लाख 39 हजार 663 जणांना कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस (First dose of corona vaccine) देण्यात आला आहे. तसंच, आतापर्यंत चार लाख 13 हजार 874 जणांनी लशीचा दुसरा डोसही घेतला आहे. आतापर्यंत एकूण दोन कोटी 82 लाख 18 हजार 457 डोसेस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोनाची नवी रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू आदींचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 23 हजार 285 नवे कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी 85.6 टक्के रुग्ण सहा राज्यांतले आहेत, असंही त्यात म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या