JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / चीनमध्ये ‘डेल्टा’चा धुमाकूळ, फुजियानमध्ये मॉल, जिम आणि रस्तेही बंद

चीनमध्ये ‘डेल्टा’चा धुमाकूळ, फुजियानमध्ये मॉल, जिम आणि रस्तेही बंद

चीनच्या (China) फुजियान (Fujian) शहरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने (Delta Variant) धुमाकूळ घातला असून शहर पूर्णतः बंद करण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बिजिंग, 14 सप्टेंबर : चीनच्या (China) फुजियान (Fujian) शहरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने (Delta Variant) धुमाकूळ घातला असून शहर पूर्णतः बंद करण्यात आलं आहे. फुजियानमधील मॉल, (Mall) जिम (Jym) आणि रस्तेदेखील (Roads) बंद करण्यात आले आहेत. या शहरातील नागरिकांनी घराबाहेरही पडू नये, असे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. स्थानिक पातळीवर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर हा निर्णय़ घेण्यात आला आहे. कोरोनाची स्थिती गंभीर रॉयटर वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार फुजियान शहरातील कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार जलदगतीनं होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरातील पुतिया शहरातदेखील कोरोनानं उच्छाद मांडला आहे. या शहराची लोकसंख्या 32 लाख आहे. कोरोनाचं संक्रमण वाढत असल्याचं पाहून चीन सरकारनं तज्ज्ञांची एक समिती पुतिया शहरात पाठवली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं 10 ते 12 सप्टेंबर या काळात फुजियामध्ये कोरोनाचे 43 नवे रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. त्यातील 35 रुग्ण हे पुतियानमधील आहेत. त्याचप्रमाणे कुठलीही लक्षणं नसणारे मात्र पॉझिटिव्ह असणारे त्याचप्रमाणे कुठलीही लक्षणं नसणारे मात्र पॉझिटिव्ह असणारे 32 रुग्ण आढळून आले आहेत. 12 सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण 95,248 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर 4,636 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी चीनच्या जियांग्सु भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तिथली परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता फुजियानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. हे वाचा - रक्तपात! तालिबाननं पुन्हा मोडलं वचन, पंजशीरमध्ये 20 जणांची हत्या चीनमधूनच कोरोनाचा पहिला व्हायरस बाहेर पडला होता. त्यानंतर चीननं कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र आता पुन्हा एकदा चीनच्या वेगवेगळ्या भागात कोरोना रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या लाटेत भारतात धुमाकूळ घातलेल्या डेल्टा व्हायरसनं आता चीनमध्ये शिरकाव केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या