फाईल फोटो
वॉशिंग्टन, 11 जून : कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलासा दिला असला. तरी कोरोनाचं संकट म्हणावं तसं अद्याप टळलेलं नाही. कोरोनाबाबतच्या अभ्यासात शास्त्रज्ञांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. फक्त एका व्यक्तीमुळे आता कोरोनाचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. ही व्यक्ती कोरोनाचा नवा व्हायरस पसरवत आहे. एका वेगळ्या मार्गाने हा व्हायरस पसरतो आहे. आता शास्त्रज्ञही त्या व्यक्तीच्या शोधात आहेत. अमेरिकेतील ओहायो राज्यातील आहे. इनसाइडरच्या वृत्तानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला मिसूरी स्कूल ऑफ मेडिसीन विद्यापीठातील आण्विक जीवशास्त्राचे प्राध्यापक मार्क जॉन्सन यांनी ट्विट केलं होतं. ते म्हणाले, जेव्हा मी कोविडची तपासणी करत होतो तेव्हा नमुन्यांमध्ये एक विषाणू आढळला, ज्यामुळे चिंता निर्माण झाली. सांडपाण्यातून हा विषाणू पसरत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. जॉन्सनने म्हणाले, सांडपाण्याच्या पाण्यात इतका विषाणू आहे की आम्हाला वाटलं की ते नर्सिंग होम, हॉस्पिटल किंवा कुत्र्यांच्या आश्रयस्थानातून येत असावं. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की या विषाणूमध्ये भार खूप जास्त आहे. ओहायोमध्ये एकच माणूस आहे, ज्यामध्ये या प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. हा गूढ विषाणू प्रामुख्याने कोलंबस शहर आणि वॉशिंग्टन कोर्ट हाऊसजवळील तपासणीत आढळून आला. ही व्यक्ती शहरातील या दोन ठिकाणी असते. एका ठिकाणी ती राहत असावी आणि दुसऱ्या ठिकाणी काम करत असण्याची शक्यता आहे. त्याच्या शरीरात आढळणाऱ्या विषाणूचे स्वरूप इतर विषाणूंपेक्षा बरंच वेगळे आहे. जर त्यांची ओळख पटली, तर भविष्यात आपल्याला कोरोनाबद्दल खूप महत्त्वाची माहिती मिळू शकेल आणि ही साथ थांबवण्यासही मदत होऊ शकेल. जवळपास वर्षभरापासून शास्त्रज्ञ त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत, पण आजतागायत तो सापडलेला नाही. मार्क जॉन्सनच्या मते, हा विषाणूचा प्रकार शोधणं आणि तो पसरवणारी व्यक्ती सापडणं यावरच कोविडचे उत्परिवर्तन कसं होतं हे समजू शकेल.