JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / रुग्ण कमी झाले मृत्यू नाही! जगापेक्षाही जास्त महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूदर; धक्कादायक रिपोर्ट

रुग्ण कमी झाले मृत्यू नाही! जगापेक्षाही जास्त महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूदर; धक्कादायक रिपोर्ट

Coronavirus death rate in Maharashtra : रुग्णसंख्या घटली तरी राज्यातील मृत्यूदराने चिंता वाढवली आहे.

0105

कोरोना रुग्णांची आकडेवारी सध्या कमी झाली आहे. देशाप्रमाणे महाराष्ट्राचाही आकडाही दिलासादायक आहे. राज्यातील नव्या रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. पण त्याचवेळी मृत्यूदर मात्र वाढताना दिसतो आहे.

जाहिरात
0205

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा जास्त आहे.

जाहिरात
0305

राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर हा 31 मे, 2021 रोजी 0.37 होता जो 27 सप्टेंबर, 2021 ला 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ रुग्णवाढ लक्षणीयरित्या कमी झाली आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही 97.26 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

जाहिरात
0405

पण त्याचवेळी मृत्यूदर मात्र वाढला आहे. 31 मे रोजी 1.66 टक्क्यांवर असलेला मृत्यू 31 ऑगस्टला 2.12 वर पोहोचला. जो 27 सप्टेंबरला वाढला नाही. पण कमीही झालेला नाही. जैसे थेच राहिला आहे.

जाहिरात
0505

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर हा जगातील कोरोना मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. जगातील कोरोना मृत्यूदर हा 2.05 टक्के आहे पण महाराष्ट्रात हा 2.12 आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या