JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / धक्कादायक! नवीन Coronavirus चं संक्रमण ब्रिटनपुरतं मर्यादित नाही, 'या' 5 देशांतही आढळले रुग्ण

धक्कादायक! नवीन Coronavirus चं संक्रमण ब्रिटनपुरतं मर्यादित नाही, 'या' 5 देशांतही आढळले रुग्ण

New Corona Virus: भारतासहीत (India) जगातील अनेक देशांनी आता ब्रिटनमधून (Britain) येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वप्रकारच्या प्रवासी वाहतूकीवर (Transportation Ban) निर्बंध आणले आहेत.

0105

ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू सापडत असल्याच्या बातमीनंतर जगभर खळबळ उडाली आहे. भारतासहीत जगातील अनेक देशांनी आता ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वप्रकारच्या प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणले आहेत. असं असलं तरी हा नवीन विषाणूचे संक्रमण किमान पाच देशात झाला, असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
0205

तथापि, हा नवीन कोरोना विषाणू अनेक देशांत आधीपासूनच उपस्थित असू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. पण धक्कादायक बातमी अशी की ब्रिटनसोबतच डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि इटलीमध्येही या नवीन कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे.

जाहिरात
0305

ब्रिटनहून एक प्रवासी रोम येथे आला, त्यामुळं इटलीमध्येही हा नवीन कोरोना विषाणू सापडला आहे. फ्रान्सलाही नवीन विषाणू संबंधित धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्सनं आता ब्रिटनसोबतची प्रवासी वाहतूक थांबविली आहे. खरं तर म्युटेशनमुळं हा नवीन नवीन कोरोना विषाणू तयार झाला असावा, असं मानलं जात आहे.

जाहिरात
0405

या विषाणूची संसर्ग करण्याची क्षमता पूर्वीच्या विषाणूपेक्षा खूपच जास्त आहे. ब्रिटनमधील प्रकरणांच्या वाढीस ते जबाबदार मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते हा विषाणू 70 टक्क्यांपर्यंत अधिक संसर्गजन्य आहे. नोव्हेंबरमध्येच कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनची 9 प्रकरणं डेन्मार्कमध्ये आढळून आली होती, तर ऑस्ट्रेलियामध्ये एक प्रकरण आढळून आलं.

जाहिरात
0505

तर नेदरलँड्स या देशात या नवीन कोरोना विषाणूचं एक प्रकरण समोर आलं आहे. बेल्जियमनं याबाबत अधिकृत पुष्टी दिलेली नाही. तर फ्रेंच आरोग्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे, या नवीन कोरोना विषाणूची चाचणी अद्याप केली नसली तरी हा विषाणू यापूर्वीच संपूर्ण फ्रान्समध्ये पसरलेला असू शकतो. उत्तर आयर्लंडच्या मंत्र्यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या