JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / 'ऑक्सिजनचा पुरवठा रोखला, तर सोडणार नाही...लटकवूच!' हायकोर्टाने दिली तंबी

'ऑक्सिजनचा पुरवठा रोखला, तर सोडणार नाही...लटकवूच!' हायकोर्टाने दिली तंबी

सध्या देशातील अनेक भागात अपुऱ्या ऑक्सिजनमुळे अनेकांना जीव गमवावे लागल्याच्या घटना मन खिन्न करणाऱ्या आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 एप्रिल : सध्या देशातील अनेक भागात अपुऱ्या ऑक्सिजनमुळे अनेकांना जीव गमवावे लागल्याच्या घटना मन खिन्न करणाऱ्या आहे. रुग्णालयात असूनही केवळ ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा नसल्यामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येत आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) शनिवारी सांगितलं की, केंद्र, राज्य किंवा स्थानिक प्रशासनाचा कोणताही अधिकारी ऑक्सिजन पुरविण्यात (Oxygen Supply) अडचण निर्माण करीत असेल तर आम्ही त्या व्यक्तीला लटकवूच. न्यायाधीश विपिन सांघी आणि जस्टिस रेखा पल्ली यांच्या बेंचकडून ही टिप्पणी महाराजा अग्रसेन रुग्णालयाच्या (Maharaja Agrasen Hospital) याचिकेच्या सुनावणीदरम्यान करण्यात आली आहे. रुग्णालयाने गंभीर आजारी कोरोना रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायकोर्टाचं दार ठोठावलं होतं. न्यायालयाने दिल्ली सरकारला (Delhi Government) सांगितलं की, त्यांनी सांगावं की कोणी ऑक्सिजनचा सप्लाय रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोर्टाने सांगितलं की, जर कोणी ऑक्सिजनचा सप्लाय रोखण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला लटकवण्यात येईल. हे ही वाचा- IPL 2021: दिल्लीत Corona चा कहर! जाणून घ्या कसे होणार IPL सामने कोणालाही सोडणार नाही… न्यायालयाच्या बेंचने सांगितलं की, आम्ही कोणालाही सोडणार नाही. न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितलं की, त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या अशा अधिकाऱ्यांबाबत केंद्राला सांगावं, म्हणजे कोर्ट त्यांच्याविरोधात कडक कारवाई करू शकतील. हायकोर्टाने केंद्र सरकारला सवाल उपस्थित केला. दिल्लीसाठी प्रत्येक दिवशी 480 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाटा देण्यात आला आहे, तो कधी मिळणार? न्यायालयाने सांगितलं, केंद्राने आम्हाला 21 एप्रिल रोजी आश्वस्त केलं होतं की, दिल्लीत प्रत्येक दिवशी 480 मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचेल. हे केव्हापर्यंत पोहोचेल? दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितलं की, त्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन केवळ 80 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे आणि शुक्रवारी त्याला तब्बल 300 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळालं होतं. यानंतर न्यायालयाने केंद्राला सवाल केला. जयपुर गोल्डन रुग्णालयात 20 रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या गंभीर संकटादरम्यान दिल्लीतील जयपुर गोल्डन रुग्णालयात 20 गंभीर रुग्णांचा रात्रीतून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. रुग्णालयातील चिकित्सा निर्देशक डॉ डी के बलूजा यांनी सांगितलं की, स्टोरेजमध्ये कमतरता असल्या कारणाने ऑक्सीजनचा दबाव कमी झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या