आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.
लखनऊ, 2 जानेवारी : कोरोना महासाथीत (Coronavirus) राजकीय वर्तुळातही बऱ्याच उलाथापालथ सुरू आहेत. असंही राजकारण करायला नेत्यांना मुद्दा हवा असतो. कोरोना सारख्या महासाथीतही हा प्रकार पाहायला मिळत आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची मोफत लस (Corona Vaccine) मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. कोरोनाची लस सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं मेगा प्लॅन तयार केला आहे. मात्र काही नेत्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. भाजपची कोरोना लस टोचून घेणार नाही, ( cannot take BJP’s vaccine) असं समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. शनिवारी त्यांनी मी भाजपची कोरोना लस टोचून घेणार नाही, असं जाहीर केलं. ते पुढे म्हणाले की, भाजपवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे भाजपकडून आलेली लस आम्ही टोचून घेणार नाही. जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा सर्वांचं मोफत लसीकरण केलं जाईल. मात्र आम्ही भाजपची लस टोचून घेऊ शकत नाही.
देशात पहिल्या टप्यात 3 कोटी लोकांना मिळेल निःशुल्क लस इतर 27 कोटी लोकांबद्दल सरकार घेणार लवकरच निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी ड्राय रन सुरू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात जाऊन याबाबत आढावा देखील घेतला आहे. त्यादरम्यान हर्षवर्धन यांनी ही घोषणा केली आहे.