JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / 300 पेक्षा जास्त Covid मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अखेर त्यालाच कोरोनानं गाठलं आणि...

300 पेक्षा जास्त Covid मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अखेर त्यालाच कोरोनानं गाठलं आणि...

कोरोना योद्धा म्हणून काम करताना 300 पेक्षा जास्त कोविड-19 संक्रमित (Corona in India) मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचा कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona Infection) मृत्यू झाला आहे.

जाहिरात

फोटो-प्रतिकात्मक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिसार (हरियाणा), 19 मे : कोरोना योद्धा म्हणून काम करताना 300 पेक्षा जास्त कोविड-19 संक्रमित (Corona in India) मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचा कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona Infection) मृत्यू झाला आहे. प्रवीण कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समजल्यापासून केवळ दोन दिवसांतच त्यांचे निधन झाले. याहीपेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे, दिवंगत प्रवीण कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्यासाठी बेड मिळवण्यासाठी तीन ते चार तास पायपीट करावी लागली. हरियाणाच्या हिसार महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे प्रमुख प्रवीण कुमार यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यांना 300 हून अधिक कोरोना-संक्रमित रूग्णांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले होते. सोमवारी उशिरा त्यांनी हिसारच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी सकाळी ऋषी नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीण यांना तीव्र तापामुळे जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मॉडेल टाऊनमधील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. यासाठीही पालिका आयुक्त अशोक गर्ग यांना हस्तक्षेप करावा लागला. प्रवीण यांच्या मृत्यूमुळे पालिकेत शोककळा पसरली आहे. महानगरपालिका आयुक्त अशोक कुमार गर्ग म्हणाले की, महामंडळ कर्मचारी प्रवीणकुमार यांचे आकस्मिक निधन अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण काळात त्यांनी कोरोना योद्धा म्हणून नि: स्वार्थ सेवा केली आहे. हे वाचा -  ‘पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा’ प्रीतम मुंडेंचं थेट नरेंद्र मोदींना पत्र हिसार संघर्ष समितीनेही प्रवीण यांच्या निधनाबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. समितीचे प्रमुख जितेंद्र श्योराण म्हणाले की, प्रवीण कोरोना साथीच्या काळात सतत सेवा देत होते. परंतु, शेवटच्या क्षणी कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर प्रशासन त्यांच्यासाठी बेडची व्यवस्थादेखील करू शकले नाही. दिवंगत प्रवीण यांच्या कुटुंबीयांना तीन ते चार तास बेडसाठी भटकावं लागलं. हे वाचा -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी प्रवीण यांची सेवा लक्षात घेता महापालिकेच्या एखाद्या शाखेला त्यांचे नाव द्यावे आणि त्यांना शहीदाचा दर्जा मिळावा. त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सहकार्य आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी प्रशासन व सरकारकडे केली. प्रवीणकुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी नगराध्यक्ष गौतम सरदाना, नगरसेवक अनिल जैन, अमित ग्रोव्हर, नगरसेवक प्रतिनिधी पंकज दिवाण आदी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या