JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / Delta plus असो की आणखी कोणताही व्हेरिएंट; तज्ज्ञांनी सांगितला कोरोनाच्या प्रत्येक रूपापासून बचावाचा सोपा उपाय

Delta plus असो की आणखी कोणताही व्हेरिएंट; तज्ज्ञांनी सांगितला कोरोनाच्या प्रत्येक रूपापासून बचावाचा सोपा उपाय

कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटपासून बचावाचे 3 मार्ग.

0108

देशात आता डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट अर्थात उत्परिवर्तन अवस्थेत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

जाहिरात
0208

देशात एकूण डेल्टा प्लस कोरोनाचे एकूण 40 रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
0308

महाराष्ट्रात सर्वाधिक 21 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये रत्नागिरीत सर्वात जास्त 9 रुग्ण आहेत. तर जळगावमध्ये 7 आणि मुंबईत 2 रुग्ण आहेत. त्यानंतर पालघर, सिंधुदुर्ग, ठाण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आहे.

जाहिरात
0408

महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश 6, केरळ आणि तामिळनाडूत प्रत्येकी 3 तर पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांत प्रत्येकी एक रुग्ण सापडलेत.

जाहिरात
0508

मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमधील महिलेचा डेल्टा प्लस कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

जाहिरात
0608

डेल्टा प्लस व्हेरिएंटचं संक्रमण वाढत असताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटपासून बचावाचा उपाय सांगितला आहे.

जाहिरात
0708

कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट असो त्याच्याशी लढण्यासाठी फक्त तीन शस्त्रं आहेत ते म्हणजे लॉकडाऊन, लसीकरण आणि कोरोना नियमांचं पालन.

जाहिरात
0808

कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट असूदे या तिन मार्गांचं नीट अवलंब केला तस संक्रमणावर नियंत्रण राहू शकतं. त्यामुळे आपण आपले शस्त्र खाली ठेवू नका, असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या