नवी दिल्ली, 23 जुलै: ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीनं तयार केलेली कोरोना वॅक्सीनची पहिल्या दोन टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वीपणे पार पडली. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करण्यात येणार असून त्या निरीक्षणानंतर हे वॅक्सीन बाजारात उपलब्ध होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या दाव्यानुसार कोरोनाची लस उपलब्ध होण्यासाठी किमान 2021 उजाडेल. तर मार्चपर्यंत ही लस बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकेल असा दावा पुण्याच्या सीरम कंपनीच्या सीईओ पुनावाला यांनी केला होता. ऑक्सफोर्डशिवाय रशिया आणि चीन या देशांनी तयार केलेलं कोरोना वॅक्सीनही अंतिम टप्प्यात आलं असून त्यावर निरीक्षण सुरू आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनासाठी संपूर्णपणे वॅक्सीनंवर अवलंबून राहता येणार नाही. अंतिम टप्प्यातील निरीक्षण आणि प्रत्यक्षात उपलब्ध झाल्यानंतरही सुरुवातीच्या टप्प्यात येणारी आव्हानं यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. हे वाचा- कोरोना पाठोपाठ भारतावर 2 आठवड्यात आणखी एक संकट, आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून अलर्ट वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार कोरोनाचं हे वॅक्सीन केवळ विषाणू किंवा आजाराची गंभीरता कमी करण्याचं सध्या काम करू शकतं. थोडक्यात सांगायचं तर या वॅक्सीनमुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकेल. हे वॅक्सीन सुरक्षित आहे. हे वॅक्सीन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात इम्युनिटी वाढवतं. 1000 हजार वॉलेंटियर्सवर केलेल्या चाचणीनंतर केलेल्या अभ्यासात हे समोर आलं आहे. हे वाचा- लहान मुलांना PMIS आजाराचा धोका, मुलांमध्ये ‘ही’ लक्षणं असतील तर घ्या काळजी कोरोनाचं जगभरात सुरू असलेलं थैमान आणि वेगानं वाढणारा संसर्ग या वॅक्सीनमुळे कमी होईल अशी आशा वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. आताच्या घडीला हे वॅक्सीन कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबवेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण अजूनही अनेक आव्हानं पार करायची असाचं शास्रज्ञांचं म्हणणं आहे.