JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / दिलासादायक बातमी! गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात, अशी आहे आजची आकडेवारी

दिलासादायक बातमी! गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात, अशी आहे आजची आकडेवारी

नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात

त्यामुळे आता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांत बदल होऊ शकते. सध्या 6 फूटांचे अंतर ठेवण्याचा नियम आहे. मात्र आता 16 फूटपर्यंत अंतर बाळगणे गरजेचे ठरू शकते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : 20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती मात्र एका दिवसांत आज दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यानं दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासांत 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्थांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात Coronavirus च्या रुग्णांमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा उच्चांकी वाढ झाली आहे. 14 हजारांवर नवे रुग्ण 24 तासांत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या Covid-19 च्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,62,491 एवढी झाली आहे. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू होत असतानाच ही विक्रमी रुग्णवाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या