JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / UNLOCK 3.0 मध्ये तुम्ही करू शकणार नाहीत ही कामं, 31 ऑगस्टपर्यंत बंदी कायम!

UNLOCK 3.0 मध्ये तुम्ही करू शकणार नाहीत ही कामं, 31 ऑगस्टपर्यंत बंदी कायम!

अनलॉक-3 ची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही खालील गोष्टी करू शकणार नाही आहात.

0110

Coronavirus चा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसला, तरी देशभरातल्या लॉकडाऊनचे नियम आणखी थोडे शिथिल होणार आहेत.

जाहिरात
0210

मात्र असे असले तरी, अद्यापही काही गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही खालील गोष्टी करू शकणार नाही आहात.

जाहिरात
0310

केंद्रीय गृह मंत्रालयनं दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टपर्यंत सर्व राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था बंदच राहणार आहेत.

जाहिरात
0410

देशातील मेट्रो सेवा बंदच राहणार आहेत. मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात आली असली तरी, सामन्यांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही आहे.

जाहिरात
0510

सिनेमा हॉलही बंद ठेवण्यात येणार आहे. याआधी सरकार काही प्रमाणात सिनेमा हॉल खुले करण्याच्या विचारत होती, मात्र अद्याप सिनेमागृहांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे.

जाहिरात
0610

त्याचबरोबर स्विमिंग पूलही बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे जिमला परवानगी देण्यात आली असली करी, स्विमिंग पूल मात्र बंदच राहणार आहे.

जाहिरात
0710

त्याचबरोबर मनोरंजन पार्कही 31 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहेत. तर, सामाजिक, राजकिय, खेळ, मनोरंजक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही आहे.

जाहिरात
0810

सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा आणि तंबाखू खाण्यावर बंदी कायम आहे.

जाहिरात
0910

लग्न समारंभात अजूनही 50 हून अधिक लोकांच्या समावेशावर बंदी आहे.

जाहिरात
1010

अंत्यसंस्कारातही 20हून अधिक लोक भाग घेऊ शकत नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने हे नियम कडक केले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या