JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / सिनेमा किंवा नाट्यगृह नाही, स्मशानभूमीच्या बाहेर लावला 'हाउस फुल'चा बोर्ड

सिनेमा किंवा नाट्यगृह नाही, स्मशानभूमीच्या बाहेर लावला 'हाउस फुल'चा बोर्ड

आपल्या नातेवाईकांच्या निधनाच्या बातम्या ऐकून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत आहे. आजही देशात लाखो केसेस समोर येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 मे : देशात कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus  Second Wave) सामना करावा लागत आहे. संपूर्ण देश कोरोना देशातून कधी जाईल याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या निधनाच्या बातम्या ऐकून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत आहे. आजही देशात लाखो केसेस समोर येत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे देशात वाढणाऱ्या मृत्यूच्या संख्येमुळे शहरांमध्ये स्मशानभूमीत जागा उपलब्ध नसल्याचं दिसत आहे. अंत्यसंस्कारासाठीदेखील तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. अशीच एक दुखद घटनेबद्दल सांगायचं झालं तर कर्नाटकची राजधानी बंगळुरू स्थित चामराजपेट (Chamrajpet) येथील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे स्मशानभूमीच्या बाहेर हाउस फूलचा बोर्ड लावल्याचं दिसून येत आहे. या स्मशानभूमीत 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जातात. त्यामुळे येथे एक बोर्ड लावण्यात आला आहे. आणि सांगितलं जात आहे की, अंत्यसंस्कारासाठी आणखी मृतदेह घेतले जाणार नाही. बंगळुरु शहरात 13 स्मशानभूमी आहेत आणि कोरोनामुळे सर्व ठिकाणी हिच परिस्थिती आहे. याशिवाय येथे कुटुंबीयांना आपल्या नातेवाईकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बराच वेळ रांगेत वाट पाहावी लागते. हे ही वाचा- कोरोनाने कुटुंब उद्ध्वस्त, 18 दिवसात 5 जणांचा मृत्यू आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार प्रदेशात सोमवारी कोरोना संसर्ग झालेल्या 239 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या वाढून 16,250 झाली आहे. यादरम्यान कोरोनाचे 44,438 नवीन प्रकरणं समोर आली आहे. त्यानुसार आता संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 16 लाखांहून अधिक झाली आहे. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सरकारने शहरातील स्मशानभूमी आणि कब्रिस्तानावरील ओझं कमी करण्यासाठी बंगळुरुच्या जवळपास 230 एकर जमीन ब्रुहट बंगळुरु महानगर पालिकेने (BBMP) घेतली आहे. याशिवाय कुटुंबांना स्वामित्त्व असलेली जमीन, शेतात अंत्यसंस्कार करण्याची परवनागी देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या