JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / आता आलेला आफ्रिकी Corona variant डेल्टापेक्षाही भयानक! 32 वेळा विषाणूने बदललंय रूप, लसही ठरतेय निरुपयोगी

आता आलेला आफ्रिकी Corona variant डेल्टापेक्षाही भयानक! 32 वेळा विषाणूने बदललंय रूप, लसही ठरतेय निरुपयोगी

Coronavirus new variant मुळे जगभरात पुन्हा दहशत पसरली आहे. 32 वेळा Mutate झालेला हा कोरोना (B 1.1.529) विषाणू आता लशीलाही (No Vaccine effective) दाद देईनासा झाला आहे.

0111

कोरोनाचा नवा व्हेरिअंट (New African varient of Coronavirus) B.1.1.529 जगभरात चिंतेचा विषय ठरला आहे. आफ्रिकेतून आलेल्या विषाणूमुळे अनेक देशांनी नवे निर्बंध लादले आहेत.

जाहिरात
0211

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या (Corona virus) या नव्या प्रकारामुळे कोरोनाचा जास्त वेगाने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0311

दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक प्रोफेसर तुलिओ डी ऑलिव्हिरा म्हणाले, 'हा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा उत्परिवर्ती विषाणू आहे, जो वेगाने पसरू शकतो.

जाहिरात
0411

Coronavirus चं हे नवं रूप म्हणजे विषाणूने 32 वेळा अवतार बदलल्यानंतर तयार झालं आहे. त्यामुळे हा नवा विषाणू लशीलाही दाद देत नसल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
0511

'बी.1.1.529' या विषाणूचे जगभरात आतापर्यंत 26 रुग्ण समोर आले आहेत. इज्राइल, बोत्सवाना, दक्षिण अफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये हा विषाणू आढळला आहे.

जाहिरात
0611

भारतातील सर्व विमानतळांना हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.

जाहिरात
0711

ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सहा आफ्रिकन देशांची उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे

जाहिरात
0811

दक्षिण आफ्रिकेतून हाँगकाँगला पोहोचलेल्या लोकांमध्येही या प्रकाराचा संसर्ग आढळून आला आहे.

जाहिरात
0911

हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन (CHP) नुसार, तपासात असे दिसून आले आहे की दोन्ही प्रकरणे B.1.1 ची आहेत. पहिल्या व्यक्तीने एअर व्हॉल्व्ह असलेला मास्क घातला होता आणि या मास्कमुळेच दुसऱ्या व्यक्तीमध्ये विषाणूचा संसर्ग झाला होता.

जाहिरात
1011

जगात सर्वात जलद लसीकरण पूर्ण केलेल्या इस्रायलमध्ये कोरोनाच्या (New variant of corona virus enters Israel) नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे.

जाहिरात
1111

B.1.1.529 हा नवा व्हेरिएंट तरुणांसाठी घातक असल्याचं दिसून आलं आहे. विशेषतः 25 वर्षे वयापेक्षा लहान व्यक्तींना या व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका असल्याचं दिसून आलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या