JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / जगातही भारताची आता भीषण परिस्थिती; समोर आली कोरोनाची धक्कादायक आकडेवारी

जगातही भारताची आता भीषण परिस्थिती; समोर आली कोरोनाची धक्कादायक आकडेवारी

कोरोनाच्या बाबतीत भारत जगात पुन्हा त्याच गंभीर स्थितीत आला आहे.

0107

भारताने गेली वर्षभर अथक प्रयत्नाने कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीतून भारत खाली घसरला होता पण आता भारत पुन्हा त्याच स्थितीत आला आहे.

जाहिरात
0207

सोमवारी (12 एप्रिल, 2021) राज्यात सर्वाधिक 1,68,912 नव्या कोरोना प्रकरणांची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा  1,35,27,717  झाला आहे.

जाहिरात
0307

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सध्या 12 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एक दिवसात 904  लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता मृतांचा आकडा  1,70,179 पोहोचला आहे.

जाहिरात
0407

देशात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण 12 फेब्रुवारीला होते. त्यावेळी ही संख्या 1,35,926 होती. तर सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्ण गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये होते. त्यावेळी ही संख्या 10,17,754 होती. आता मात्र अॅक्टिव्ह रुग्ण 12,01,009 झाले आहेत. जे जगातील एकूण प्रकरणांच्या 8.88 टक्के आहेत.

जाहिरात
0507

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी झाला आहे. रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्याही खाली आला आहे. हा दर आता 89.86 टक्के आहे.

जाहिरात
0607

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोना संसर्गाच्या बाबतीत आता भारताने ब्राझीलसुद्धा मागे टाकलं आहे. भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

जाहिरात
0707

आता तिसऱ्या स्थानावर गेलेल्या ब्राझीलमध्ये आतापर्यंत  1,34,82,023  प्रकरणं आहेत तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत  3,11,98,055 प्रकरणं आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या