JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / अलर्ट! मानवी त्वचेवर 9 तास जिंवत राहू शकतो Corona, व्हायरसपासून वाचण्याचा फक्त एकच उपाय

अलर्ट! मानवी त्वचेवर 9 तास जिंवत राहू शकतो Corona, व्हायरसपासून वाचण्याचा फक्त एकच उपाय

शास्त्रज्ञांच्या पथकाने या अभ्यासात असे म्हटले आहे की वारंवार हात स्वच्छ करणे किती आवश्यक आहे हे सिद्ध करते.

0107

कोरोना संबंधित एक रिसर्ट करताना जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने धक्कादायक दावा केला आहे. या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की कोरोना बरेच तास मनुष्याच्या त्वचेवर टिकून राहू शकतो. जर त्याला अनुकूल वातावरण प्राप्त झाले तर ते मानवी त्वचेवर सुमारे 9 तास कोरोना जिवंत राहू शकेल.

जाहिरात
0207

विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, या टीमने अनेक प्राणी व मानवांच्या त्वचेवर कोरोना अस्तित्वा संदर्भात अभ्यास केला. या अभ्यासात टीमला असे आढळले आहे की कोरोना इन्फ्लूएंझा-A व्हायरसपेक्षा जास्त काळ मनुष्यांच्या त्वचेवर टिकू शकतो.

जाहिरात
0307

शास्त्रज्ञांच्या पथकाने या अभ्यासात असे म्हटले आहे की वारंवार हात स्वच्छ करणे किती आवश्यक आहे हे सिद्ध करते. संशोधन पथकाच्या म्हणण्यानुसार, सॅनिटायझर वापरण्यापेक्षा पाण्याने हात धुणे नेहमीच फायदेशीर ठरते.

जाहिरात
0407

क्लिनिकल इन्फेकशियस डिसीज जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस आणि इन्फ्लूएंझा-A व्हायरसवर लक्ष ठेवून हे संशोधन केले गेले. या संशोधनात स्पष्ट झाले आहे की कोरोना वेगाने पसरण्यास अधिक सक्षम आहे. हा व्हायरस मानवी त्वचेवर वातावरणानुसार जिवंत राहतो.

जाहिरात
0507

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार जगातील एकूण लोकसंख्येपैकी 10% लोक कोरोनाव्हायरसने संक्रमित आहेत. WHOचे आपत्कालीन प्रमुख डॉ. मायकेल रायन यांनी सोमवारी सांगितले की, एका अंदाजानुसार जगभरातील 10 पैकी एकाला संसर्ग होऊ शकतो.

जाहिरात
0607

एका अंदाजानुसार जगातील एकूण लोकसंख्या 760 कोटी आहे. WHOच्या मते, त्यापैकी 350 कोटीहून अधिक लोकांना कोरोना होऊ शकतो. काही तज्ज्ञ बर्‍याच काळापासून सांगत आहेत की संक्रमित लोकांची संख्या सध्या सांगितल्या जाणाऱ्यांपेक्षा जास्त आहे.

जाहिरात
0707

डॉ. रायन म्हणाले की सावधगिरीने बर्‍याच लोकांचे प्राण वाचू शकतात. दक्षिण-पूर्व आशियामध्ये प्रकरणे वाढली आहेत. युरोप आणि पूर्व भूमध्य भागात अधिक मृत्यू होत आहेत. त्याच वेळी, आफ्रिका आणि पश्चिम पॅसिफिकमध्ये परिस्थिती अधिक चांगली आहे. साथीचा रोग वाढत आहे, असा इशारा रायन यांनी दिला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या