JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / बापरे! फक्त फुफ्फुस नव्हे तर आता हृदयापर्यंत पोहोचला Coronavirus

बापरे! फक्त फुफ्फुस नव्हे तर आता हृदयापर्यंत पोहोचला Coronavirus

Coronavirus फक्त फुफ्फुसावरच (lung) नाही तर हृदयावरही (heart) हल्ला करतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 19 एप्रिल : कोरोनाव्हायरस (Coronavirus) हा फुफ्फुसांवर (lung) हल्ला करतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे, मात्र आता Covid-19 बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा व्हायरस फक्त फुफ्फुसावरच नाही तर हृदयावरही (heart) हल्ला करतो आहे. लाइव्ह सायन्स ने याबाबत वृत्त दिलं आहे. लाइव्ह सायन्सशी बोलताना न्यूयॉर्कमधील नॉर्थवेल हेल्थचे संचालक डॉ. एरिक यांनी हा व्हायरस शरीरातील प्रत्येक भागावर हल्ला करत असल्याचं सांगितलं. डॉ. एरिस यांनी सांगितलं, कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये Myocardities हे हृदयाचं इन्फेक्शन दिसून आलं आहे. कोरोना रुग्णाला हृदयाचं इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरस हा नाक, तोंड आणि डोळ्यांमार्फत श्वसनमार्गात जातो आणि तिथून फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. यानंतर या व्हायरसचा प्रवास जास्त धोकादायक असतो. कारण हा रक्तामार्फत शरीरातील विविध अवयवांपर्यंत पोहोचतो. दरम्यान चीनमध्ये झालेल्या एका अभ्यासातही कोरोना रुग्णांना हृदयाच्या समस्या उद्भवल्याचं दिसून आलं आहे. 5 पैकी एका रुग्णाच्या हृदयाला हानी पोहोचवी होती. जामा कार्डिओलॉजी मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. लाइव्ह सायन्स शी बोलताना जॉन्स होपकिन्स स्कूल ऑफ मेडिसीनच्या डॉ. एरिन मिशोस म्हणाल्या, हृदय आणि फुफ्फुसाच्या पेशींवर angiotensin-converting enzyme 2 (ACE2)  हे प्रोटिन असतं, ज्याच्यामार्फत व्हायरस पेशींमध्ये प्रवेश करतो. मात्र हेच प्रोटिन संरक्षण म्हणूनही कार्य करतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या