JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / ऑगस्ट अखेरीस कोरोनाचा कहर, वाचा 24 तासांतील रेकॉर्डब्रेक आकडेवारी

ऑगस्ट अखेरीस कोरोनाचा कहर, वाचा 24 तासांतील रेकॉर्डब्रेक आकडेवारी

देशात कोरोनामुळे 24 तासांत 1,021 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यूची आकडेवारी 62,550 वर पोहोचली आहे.

जाहिरात

पुण्यात 55 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात 17 रूग्ण हे पुण्याबाहेरचे आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट : गेल्या तीन दिवसात सलग 75 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा विस्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत सलग तिसऱ्या दिवस 76 हजार 472 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशात कोरोनामुळे 24 तासांत 1,021 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यूची आकडेवारी 62,550 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 34 लाख 63 हजार 973 वर पोहोचली आहे. 7 लाख 52 हजार 424 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली आहे.

संबंधित बातम्या

हे वाचा- हिवाळ्यात कोरोनाचा मृत्यूदर हाताबाहेर जाईल, WHO ने दिला धक्कादायक इशारा दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणत नवीन रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. सर्वात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कोरोनातून बरे होण्याचा दर हा चांगला आहे. भारतात आतापर्यंत 26 लाख 48 हजार 999 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी पुन्हा एकदा 14 हजार 364 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 14 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये 331 जणांची भर पडली आहे. तर 11 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यू दर हा 3.16 टक्यांवर आला आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 47 हजार 995 एवढी झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या