JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / खासगी रुग्णालयात Corona vaccine घेणार आहात; इथं पाहा कोरोना लशीचे नवे दर

खासगी रुग्णालयात Corona vaccine घेणार आहात; इथं पाहा कोरोना लशीचे नवे दर

केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लशीचे नवे दर जारी (corona vaccine rate in private hospital) केले आहेत.

0107

21 जूनपासून केंद्र सरकारमार्फत 18+ सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. पण ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना ती घेता येईल.

जाहिरात
0207

देशातील लस उत्पादनाच्या 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. पण इथल्या लसीकरणावर राज्य सरकारचं लक्ष असेल.

जाहिरात
0307

खासगी रुग्णालयातील लशीसाठी पैसे आकारले जातील आणि याचे जास्तीत जास्त दर आता निश्चित करण्यात आले आहेत. या रुग्णालयांना जास्तीत जास्त 150 रुपयांपर्यंतच सर्व्हिस चार्ज आकारता येईल.

जाहिरात
0407

नव्या दरानुसार पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस प्रति डोस 780 रुपयांना असेल (लशीची मूळ किंमत 600 रुपये + 5% GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

जाहिरात
0507

हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन प्रति डोस  1410 रुपये असेल (लशीची मूळ किंमत 1200 रुपये + 60 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

जाहिरात
0607

रशियाची स्पुतनिक-V प्रति डोस 1145 रुपये (लशीची मूळ किंमत 948 रुपये + 47 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

जाहिरात
0707

या निश्चित दरापेक्षा अधिक दर आकाराल्यास खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या