JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / घाबरू नका! बिनधास्त घ्या Corona vaccine; कोरोना लशीच्या सुरक्षिततेबाबत हा घ्या पुरावा

घाबरू नका! बिनधास्त घ्या Corona vaccine; कोरोना लशीच्या सुरक्षिततेबाबत हा घ्या पुरावा

Corona vaccination : कोरोना लसीकरणाच्या 6 महिन्यांत कोरोना लस घेतल्यानंतर नेमका किती गंभीर दुष्परिणाम झाला आहे, याची ही सरकारी आकडेवारी.

0107

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. आता 18+ सर्वांना कोरोना लस दिली जाते आहे. लसीकरण मोहिमेला 6 महिने झाले तरी अद्यापही अनेकांना कोरोना लशीची भीती वाटते आहे.

जाहिरात
0207

कोरोना लस घेतल्यानंतर काही जणांचे होणारे मृत्यू आणि दुष्परिणाम यामुळे नागरिक कोरोना लस घ्यायला घाबरत आहेत. पण कोरोना लस किती सुरक्षित आहे, याचा पुरावा देणारा आकडेवारी सरकारमार्फत मिळाली आहे.

जाहिरात
0307

सीएनए न्यूज 18 ला मिळालेल्या सरकारी आकडेवारीनुसार 16 जानेवारी ते 7 जूनपर्यंत कोरोना लस घेतल्यानंतर 488 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 26 हजार लोकांवर साइड इफेक्ट दिसून आले आहेत.

जाहिरात
0407

अॅडवर्स इवेंट फॉलोइंग इन्युनाइजेशन (AEFI) म्हणजे लशीनंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा हा आकडा तुम्हाला जास्त वाटत असला तरी तज्ज्ञांच्या मते, एकूण लसीकरणाच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे.

जाहिरात
0507

7 जूनपर्यंत देशात एकूण 23.5 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे, त्यापैकी 26200 AEFI प्रकरणं आहेत. टक्केवारीचा विचार करता हा आकडा फक्त 0.01 टक्के आहे. AEFI ची एकूण 26,200 प्रकरणं आहेत. त्यापैकी 488 म्हणजे फक्त 2 टक्के मृत्यू झाले आहेत.

जाहिरात
0607

सोप्या भाषेत सांगायचं तर 143 दिवसांत 10 हजार लोकांपैकी फक्त एका व्यक्तीवर लशीचा जास्त दुष्परिणाम दिसून आला. तर लस घेणाऱ्या 10 लाख व्यक्तींपैकी फक्त दोघांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
0707

तज्ज्ञांच्या मते, एकूण कोरोना लसीकरणाच्या तुलनेत दुष्परिणामांचा परिणाम खूपच कमी आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे तीन लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात कोरोनावर मात देण्यासाठी कोरोना लसही सर्वात प्रभावी शस्त्र आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या