JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / ऑपरेशन कवचकुंडल आहे तरी काय? नगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्ण वाढल्यानं होणार अंमलबजावणी

ऑपरेशन कवचकुंडल आहे तरी काय? नगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्ण वाढल्यानं होणार अंमलबजावणी

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं ‘मिशन कवचकुंडल’अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे.

0105

मुंबई, 09 ऑक्टोबर : कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं 'मिशन कवचकुंडल'अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे.

जाहिरात
0205

पण राज्यात लसींचा साठा उपलब्ध असताना देखील काल राज्यात 15 लाख लशीचं टार्गेट पूर्ण झालं नाही. याबद्दल टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं असून सुरू असलेला पाऊस, अतिवृष्टी आणि सध्या कामांचे दिवस असल्याने ठरवलेला आकडा गाठता आला नाही. पण यासंदर्भात अधिकाऱ्यांची २ वेळा बैठक घेण्यात आली असून लसीकरण करणं हे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
0305

कोरोनाची दुसरी लाट राज्यातून ओसरत असली तरी अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण (Corona Patient) सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज राज्यात 2486 नवीन रुग्ण कोरोना रुग्ण सापडले असून 44 रुग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के इतके आहे.

जाहिरात
0405

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा रुग्णवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नगरमध्ये आज 340 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यातही आकडा वाढल्याचे दिसत असून जिल्ह्यात आज 162 रुग्ण सापडले आहेत. तसेच साताऱ्यातही 102 बाधित रुग्णांची आज नोंद झाली असून पुण्यात 264 रुग्ण आज पॉझिटिव्ह सापडले आहेत. विशेषत: या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर मुंबई आणि सर्व उपनगरांमध्ये मिळून 978 कोरोना बाधित रुग्ण आज सापडले आहेत.

जाहिरात
0505

राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यात आले आहे. मात्र, अजूनही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण, 'ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही' असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी सांगितलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या